TRENDING:

२६ तास शोधकार्य पण तरीही पत्ता लागेना, विसर्जनावेळी गिरणा नदीत बुडून तरुण बेपत्ता

Last Updated:

Ganesh Visarjan 2025: गिरणा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे नदीचा प्रवाह जोरात होता. त्यावेळी राहुलला पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहत गेला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विजय वाघमारे, प्रतिनिधी, जळगाव : गणपती विसर्जनादरम्यान जळगावच्या गिरणा नदीत बुडून तरुण बेपत्ता झाला आहे. जवळपास ५० तास उलटूनही शोधकार्य सुरूच आहे. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
जळगाव गणेश विसर्जन मिरवणुकीत पोरगा बेपत्ता
जळगाव गणेश विसर्जन मिरवणुकीत पोरगा बेपत्ता
advertisement

वाघ नगरातील राहुल सोनार हा विसर्जनासाठी गिरणा नदीत उतरला. गिरणा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे नदीचा प्रवाह जोरात होता. त्यावेळी राहुलला पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहत गेला. राहुलसोबत असलेल्या मित्राला वाचविण्यात सुदैवाने यश आले आहे. घटनेच्या ५० तासांनंतरही मृतदेह सापडलेला नसून शोधकार्य सुरू आहे !

घटना कशी घडली?

advertisement

जळगाव शहरात आर्यन पार्क येथील गिरणा नदीपात्रात गणपती विसर्जनादरम्यान दुर्दैवी घटना घडली. वाघ नगर येथे राहणारा राहुल रतिलाल सोनार हा तरुण आपल्या मित्रासोबत विसर्जनासाठी नदीत उतरला असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो प्रवाहात वाहून गेला. राहुलसोबत असलेल्या विश्वनाथ पाटील याला एका नागरिकाच्या मदतीने वाचवण्यात यश आले, मात्र राहुलचा शोध लागलेला नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शोधकार्य सुरू केले असून, घटनेला २६ तास उलटूनही त्याचा काही थांगपत्ता लागलेला नाही. गिरणा धरणाचे सहा दरवाजे उघडलेले असल्यामुळे गिरणा नदीचा प्रवाह वेगवान असल्यामुळे गिरणा नदीच्या काठावरील गावांमध्ये देखील राहुलचा शोध घेतला जात आहे. दरम्यान गिरणा नदीतच गणेश कोळी हा तरुण देखील गणपती विसर्जना वेळी वाहून गेलेला आहे. त्याचा देखील अद्याप शोध लागलेला नाही.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
२६ तास शोधकार्य पण तरीही पत्ता लागेना, विसर्जनावेळी गिरणा नदीत बुडून तरुण बेपत्ता
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल