बाडमेर : जर आयुष्यात काहीतरी करायची जिद्द असेल आणि त्यादिशेने कठोर मेहनत केली तर व्यक्ती यश मिळवू शकतो, हे पुन्हा एका व्यक्तीने सिद्ध करुन दाखवले आहे. सध्या देशात अनेक प्रकारचे स्टार्टअप्स सुरू होते आहेत. तरुणाई अगदी कमी वयात विविध व्यवसाय सुरू करत आहेत. तसेच अनेक जण त्यात यशस्वीही होत आहेत. आज अशाच एका 8 वी पास असलेल्या व्यक्तीची कहाणी आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
या व्यक्तीने स्वत:चे स्टार्टअप सुरू केले होते आणि आज त्यांच्या कंपनीचा टर्नओव्हर कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. भूणिया सारख्या लहान गावातून येणाऱ्या या व्यक्तीचा हा प्रवास खूप संघर्षमय राहिला आहे. उम्मेदाराम प्रजापत असे या व्यक्तीचे नाव आहे. ते फक्त आठवी पास आहेत. मात्र, आज ते वर्षाला 4 कोटी रुपये कमावत आहेत.
नोकरी वाल्यांपेक्षा जास्त पैसे कमवायचे आहेत, तर मग आताच करा हे काम, सर्वांना कराल चकित!
उम्मेदाराम यांच्या याठिकाणी तयार होणारे सिंग मखाना, सिंगोडा शेव आणि ओला लाडू खूप प्रसिद्ध आहेत. 2011 पासून त्यांनी साखरेपासून तयार होणारे मखाने, बत्तासे, लाडू, सिंगोडो शेव याचा व्यवसाय सुरू केला होता. इतकेच नव्हे तर त्यांची उत्पादने आता बाडमेरसोबत बालोतरा, सांचौर, जोधपुर आणि जालोर जिल्ह्यांपर्यंत विकली जातात.
त्यांची उत्पादने ही मंदिरात प्रसाद म्हणून मोठ्या प्रमाणात वापरली जातात. बाडमेर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या यात्रा, धार्मिक सण यावेळी त्यांच्या उत्पादनांना मोठी मागणी असते. तसेच पश्चिमी राजस्थानच्या प्रत्येक लग्न समारंभात, इतर कार्यक्रमांमध्ये त्यांच्या बत्ताशांना मोठी मागणी आहे.
तणाव-एकटेपणा दूर होणार, ऊर्जेचा भांडार म्हणजे एकमुखी रुद्राक्ष, पण घातल्यावर ही चूक अजिबात करू नका!
2011 मध्ये सुरू केले स्टार्टअप -
भूणिया येथील रहिवासी असलेले उम्मेदाराम हे फक्त आठवी पास आहेत. त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला आणि आज ते वर्षाला कोट्यवधी रुपये कमावत आहेत. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला आणि 2011 मध्ये त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. यामध्ये साखरेपासून सिगोडा शेव, सिंग मखाना, बत्ताशे, लाडू हे पदार्थ बनवले जातात. दररोज 3 टन पेक्षा जास्त मालाची विक्री होते. आता त्यांच्या या व्यवसायाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले.