तणाव-एकटेपणा दूर होणार, ऊर्जेचा भांडार म्हणजे एकमुखी रुद्राक्ष, पण घातल्यावर ही चूक अजिबात करू नका!

Last Updated:

असेही मानले जाते की, जेव्हा तुम्ही कोणत्याही मोठ्या आजाराने त्रस्त असाल तेव्हा जर तुम्ही रुद्राक्षाची माळा धारण केली तर तुम्हाला खूप आराम मिळतो.

एकमुखी रुद्राक्ष (फाईल फोटो)
एकमुखी रुद्राक्ष (फाईल फोटो)
परमजीत कुमार, प्रतिनिधी
देवघर : हिंदू धर्माला मानणारे अनेक लोक रुद्राक्षाची माळा घालतात. विशेष करुन महादेवाचे भक्त रुद्राक्षाची माळा घालतात. अशी मान्यता आहे की, रुद्राक्षात प्रचंड ऊर्जा असते. विशेष करुन एक मुखी रुद्राक्षाची महिमा मोठी आहे. हृदयविकार असो, मानसिक ताणतणाव असो किंवा एकटेपणा असो, या सर्व समस्याही एकमुखी रुद्राक्षाच्या मदतीने दूर होतात.
तसेच असेही मानले जाते की, जेव्हा तुम्ही कोणत्याही मोठ्या आजाराने त्रस्त असाल तेव्हा जर तुम्ही रुद्राक्षाची माळा धारण केली तर तुम्हाला खूप आराम मिळतो. मात्र, रुद्राक्षाच्या माळेचा लाभ तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही ती विधीनुसार धारण कराल. ही माळा घातल्यानंतर त्याचे नियम पाळा नाहीतर ती सामान्य माळेसारखी तुमच्या गळ्यात असेल. तिचा कोणताही फायदा तुम्हाला होणार नाही.
advertisement
नोकरी वाल्यांपेक्षा जास्त पैसे कमवायचे आहेत, तर मग आताच करा हे काम, सर्वांना कराल चकित!
देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषाचार्य पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना ते म्हणाले की, रुद्राक्षाची माळा धारण केल्याने सर्व प्रकारचे दोष समाप्त होतात. भगवान शंकराचा आशिर्वाद या माळेच्या स्वरुपात तुमच्याजवळ असतो. रुद्राक्ष ऊर्जेचा भांडार आहे. हायपरटेन्शन, मानसिक तणावर किंवा एकटेपणा जाणवत असेल तर एकमुखी रुद्राक्षाची माळा धारण करावी. ही माळा तुमच्या शरीरात जादूसारखी काम करेल. शास्त्रज्ञसुद्धा या रुद्राक्षाच्या माळेची शक्ती मान्य करतात. एक मुखी रुद्राक्षाची माळा घालून ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा दररोज जप करावा.
advertisement
हे आहेत नियम -
एक मुखी रुद्राक्ष धारण करण्याआधी त्या माळेला शिवलिंगाचा स्पर्श करायला हवा. ज्या दिवशी शिववास असतो, त्या दिवशी रुद्राक्षाची माळा घालावी. सोबत ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा जप करावा. अंघोळ करताना रुद्राक्षाची माळा अजिबात घालू नका. रुद्राक्षावरील पाणी जर जातकाच्या पायाला लागली तर विपरीत परिणाम होतात. रुद्राक्षाची माळा धारण केल्यानंतर तामसिक भोजन अजिबात करू नये, अशी माहितीही त्यांनी दिली.
advertisement
सूचना : ही माहिती राशि-धर्म आणि शास्त्रांच्या आधारावर ज्योतिषाचार्य आणि आचार्यांशी संवाद करुन लिहिली गेली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
मराठी बातम्या/अध्यात्म/
तणाव-एकटेपणा दूर होणार, ऊर्जेचा भांडार म्हणजे एकमुखी रुद्राक्ष, पण घातल्यावर ही चूक अजिबात करू नका!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement