TRENDING:

Ganesh idols : गाईच्या शेणापासून साकारल्या गणेश मूर्ती, महिन्याला होते हजारो रुपयांची कमाई

Last Updated:

सुरुवातीला प्रयोग म्हणून त्यांनी शेणापासून धूप दिवे बनवले. त्यात यश मिळाल्यानंतर त्यांनी शेणापासून होम डेकॉरच्या विविध वस्तू तयार केल्या. त्यांच्या या कलाकुसरीचं अनेकांनी कौतुक केलं.

advertisement
नाशिक: सध्याची लाईफस्टाईल फार धकाधकीची झाली आहे. घरातील तरुण मंडळी कामानिमित्त सतत धावपळत करत असतात. कामाच्या ताणामुळे त्यांना कुटुंबियांना पुरेसा वेळ देखील देता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये घरातील ज्येष्ठ मंडळी एकाकी पडतात. नाशिक येथे राहणाऱ्या 55 वर्षीय रोमा वर्मा या देखील अशाच प्रकारे एकाकी पडल्या होत्या. मात्र, त्यांनी खचून न जाता स्वत:च्या करमणुकीसाठी एक वेगळा मार्ग शोधून काढला. त्या शेणापासून गणेश मूर्ती आणि कलाकुसरीच्या वस्तू तयार करतात. यातून त्यांची करमणूक तर होतेच शिवाय आर्थिक कमाई देखील होत आहे.
advertisement

रोमा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातील त्यांच्या घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी काही वर्षे प्ले-स्कूल चालवले. नंतर काही दिवस साडी विक्रीचा व्यावसाय देखील केला. या काळात त्यांच्या मुलांचं शिक्षण पूर्ण झालं. त्यांची मुलं डॉक्टर झाली आहेत. पण, कामाच्या व्यापामुळे मुलांना आईला पुरेसा वेळ देता येत नाही. म्हणून रोमा यांनी विरंगुळा म्हणून वेगवेगळ्या पर्यायांचा शोध सुरू केला. यातूनच त्यांना गाईच्या शेणापासून विविध वस्तू तयार करण्याचा छंद जडला.

advertisement

Women Success Story: नोकरी सोडली, आवड बनली प्रोफेशन, नीलिमाताई आता महिन्याला कमावतात 90000 रुपये नफा!

सुरुवातीला प्रयोग म्हणून त्यांनी शेणापासून धूप दिवे बनवले. त्यात यश मिळाल्यानंतर त्यांनी शेणापासून होम डेकॉरच्या विविध वस्तू तयार केल्या. त्यांच्या या कलाकुसरीचं अनेकांनी कौतुक केलं. कोरोना काळानंतर त्यांनी शेणापासून गणपती बनवले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने रोमा यांनी आता आपल्या छंदाचं व्यवसायात रुपांतर केलं आहे.

advertisement

मागील तीन वर्षांपासून रोमा शेणापासून तयार केलेल्या मूर्ती आणि कलाकुसरीच्या वस्तूंची विक्री करत आहेत. या माध्यमातून त्या महिन्याला सुमारे 60 हजार रुपये मिळवतात. याशिवाय 'मास्टर आर्ट अँड क्राफ्ट' या यूट्युब चॅनलच्या माध्यमातून त्या इतरांना मोफत कलेचे धडे देखील देतात. याच नावाने त्यांचे इन्स्टाग्राम पेज देखील आहे. त्या पेजच्या माध्यमातून त्या व्यवसाय करतात.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Ganesh idols : गाईच्या शेणापासून साकारल्या गणेश मूर्ती, महिन्याला होते हजारो रुपयांची कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल