Women Success Story: नोकरी सोडली, आवड बनली प्रोफेशन, नीलिमाताई आता महिन्याला कमावतात 90000 रुपये नफा!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Women Success Story: आपली आवड ही आपले प्रोफेशन बनले की यश मात्र भरभरून मिळत असते. असेच काही नाशिकच्या नीलिमा कुलकर्णी यांना पाहून वाटते.
नाशिक: आपली आवड ही आपले प्रोफेशन बनले की यश मात्र भरभरून मिळत असते. असेच काही नाशिकच्या नीलिमा कुलकर्णी यांना पाहून वाटते. त्यांनी आपल्या अंगातील कलागुणांचा आणि लहानपणापासून असलेल्या शिवणकामाच्या आवडीमुळे नोकरी सोडून स्वतःचा श्री बॅग नावाचा व्यवसाय सुरू केला आहे. नोकरी करूनही पाहिजे तसा पैसा मिळत नाही आणि स्वप्नही पूर्ण होत नाही. याकरिता त्यांनी बॅग बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.
advertisement
नीलिमा लहान असताना त्यांच्या आई घरात शिवणकाम करत असे. त्यावेळी आपणदेखील हे करू शकतो असे त्यांना वाटत असे. परंतु त्यांच्या आईला आपल्या मुलीने शिक्षणात लक्ष द्यावे असे वाटत असे यामुळे त्या त्यांना या गोष्टी शिकवत नव्हत्या पण नीलिमा यांच्या आजीने त्यांना याबद्दलची माहिती दिली आणि त्यांचा इंटरेस्ट यात वाढू लागला. हळूहळू नीलिमा या गोष्टी शिकू लागल्या आणि शिक्षणदेखील पूर्ण केले.
advertisement
बी.कॉम पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी एका नामांकित कंपनीत नोकरीदेखील केली. परंतु नोकरीत मन रमत नाही याकरिता त्यांनी आपल्या आवडीचा व्यवसाय करण्याचे ठरवले असता नोकरी सोडून त्या ब्लाऊज आणि लेडीज ड्रेस बनवून विक्री करत असत. नीलिमा सांगतात, लग्नानंतर त्यांच्या नवऱ्याने त्यांना साडी घेण्यास 500 रुपये दिले होते. परंतु त्यांनी साडी न घेता, त्या कापड आणले आणि पहिल्यांदा एक ज्वेलरी बॉक्स बनवला. 500 रुपयांपासून 1500 रुपये कमवल्यानंतर त्यांना या व्यवसायात आणखीन रस आला. आज या स्वतःदेखील त्यांच्या या व्यवसायातून 80 ते 90 हजाराची कमाई करत आहेत आणि इतरांनादेखील त्या रोजगार पुरवत आहेत.
advertisement
नीलिमा या श्री बॅग या त्यांच्या यूट्यूब चॅनलवरून रोज मोफतमध्ये बॅग कसे बनवणे आणि शिवणकाम विषयी माहिती पुरवत असतात. तुम्हाला देखील यांच्यासोबत जुळून एक रोजगार सुरू करण्याची इच्छा असल्यास त्यांच्या श्री बॅग या इंस्टाग्राम पेजला नक्की भेट द्या आणि अधिक माहिती जाणून घ्या.
advertisement
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
July 25, 2025 10:16 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Women Success Story: नोकरी सोडली, आवड बनली प्रोफेशन, नीलिमाताई आता महिन्याला कमावतात 90000 रुपये नफा!