IPL 2026 : काय म्हणता? मुंबई-चेन्नईची मॅचच नाही... शॉकिंग आहे आयपीएलचं टाईम टेबल!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 च्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. आयपीएलच्या 19 व्या हंगामाचा पहिला सामना 28 मार्चपासून सुरू होणार आहे.
मुंबई : आयपीएल 2026 च्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. आयपीएलच्या 19 व्या हंगामाचा पहिला सामना 28 मार्चपासून सुरू होणार आहे, तर 31 मे रोजी आयपीएलची फायनल होईल. आयपीएलचा पहिला सामना गतविजेती आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. आयपीएलने आतापर्यंत फक्त पहिल्या 20 सामन्यांच्या वेळापत्रकाचीच घोषणा केली आहे.
पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि आसाममध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यामुळे 12 एप्रिलपर्यंतच्या मॅचची घोषणा करण्यात आली आहे. या तिन्ही राज्यांमध्ये आयपीएलचे सामने होणार आहेत. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता केकेआरचं तर तामिळनाडूची राजधानी चेन्नई सुपरकिंग्सचं होमग्राऊंड आहे. याशिवाय राजस्थान रॉयल्स त्यांचे 3 सामने आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये खेळणार आहे. विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतरच आयपीएलच्या उरलेल्या वेळापत्रकाची घोषणा होईल.
advertisement
मुंबई-चेन्नई मॅचच नाही
पहिल्या 20 सामन्यांमध्ये आयपीएल इतिहासातील सगळ्यात हाय व्होल्टेज असलेल्या मुंबई आणि चेन्नई सुपरकिंग्सचा एकही सामना नाही. मुंबई आणि चेन्नईच्या सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात, पण पहिल्या टप्प्यामध्ये दोन्ही टीमच्या मॅच होणार नसल्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर मुंबई-चेन्नईच्या सामन्याची घोषणा होणार आहे.
advertisement
पहिल्या टप्प्यातले मुंबई इंडियन्सचे सामने
मुंबई इंडियन्स विरुद्ध केकेआर- 29 मार्च, मुंबई, संध्याकाळी 7.30 वाजता
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स- 4 एप्रिल, दिल्ली, दुपारी 4 वाजता
राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स- 7 एप्रिल, गुवाहाटी, संध्याकाळी 7.30 वाजता
मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी- 12 एप्रिल, मुंबई, संध्याकाळी 7.30 वाजता
पहिल्या टप्प्यातल्या चेन्नईच्या मॅच
advertisement
राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स- 30 मार्च, गुवाहाटी, संध्याकाळी 7.30 वाजता
चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध पंजाब किंग्स- 3 एप्रिल, चेन्नई, संध्याकाळी 7.30 वाजता
आरसीबी विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स- 5 एप्रिल, बंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजता
चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स- 11 एप्रिल, चेन्नई, संध्याकाळी 7.30 वाजता
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 11, 2026 8:46 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : काय म्हणता? मुंबई-चेन्नईची मॅचच नाही... शॉकिंग आहे आयपीएलचं टाईम टेबल!









