advertisement

‘Ek Din’चा रोमँटिक ट्रेलर रिलीज, साई पल्लवी आमिर खानच्या लेकासोबत करणार रोमान्स; Video

Last Updated:

जुनैद खान आणि साई पल्लवी स्टारर 'एक दिन' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटातील जुनैद आणि साई पल्लवीच्या रोमान्सची फॅन्समध्ये जोरदार चर्चा होत आहे.

News18
News18
मुंबई: आमिर खानचा मुलगा जुनैद खान आणि साई पल्लवीच्या 'एक दिन' चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच सोशल मीडियावर रिलीज झालेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या चित्रपटाची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू होती, आता अखेर त्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. जुनैद आणि साई हे सध्याचे आघाडीचे कलाकार चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 1 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून एका लव्हस्टोरीवर आधारित हा चित्रपट असणार आहे.
'एक दिन'च्या ट्रेलरच्या सुरूवातीला फॉर्च्युन बेल (नशीबाची घंटा) दिसते. जिथून त्या प्रेमीयुगलांची लव्हस्टोरी सुरू होते. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच चित्रपटाचे कथानक सुद्धा आहे. प्रेमासाठी पाहिलेलं स्वप्न, ते कशा पद्धतीने पूर्ण होतं, हे आपल्याला ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. त्यानंतर ते कशा पद्धतीने एकमेकांच्या प्रेमात पडतात? त्यांचे एकमेकांवरील प्रेम कशा पद्धतीने बहरत जाते? हे आपल्याला ट्रेलरमध्ये दिसेल. अगदी नावाप्रमाणेच चित्रपटाची संपूर्ण स्टोरी आपल्याला मिळेल. चित्रपटातील, जुनैद आणि साई पल्लवीतील लव्हस्टोरी इमोशनल आणि हृदयस्पर्शी आहे.
advertisement
चित्रपटातील अनेक विहंगम दृष्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. चित्रपटाची शुटिंग जपानमधील सपोरोमधील बर्फाच्छादित प्रदेशात झालीये. ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना अनेक भावनिक प्रसंग बघायला मिळत आहे. चित्रपटातले दोन्हीही पात्रांमधील फरक स्पष्टपणे दिसून येतोय. जुनैदचा चित्रपटात एका प्रेमळ आणि संकोची मुलासारखा स्वभाव दिसतो, जो त्याच्या भूमिकेतील साधेपणा अधोरेखित करतो, तर साई पल्लवी आत्मविश्वासू आणि शांत दिसते. या फरकामुळे त्यांची केमिस्ट्री आणखीनच मनोरंजक दिसते, ज्यामुळे त्यांची लव्हस्टोरी पाहणे आणखीनच मजेशीर वाटतेय. काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील अरिजीत सिंगच्या आवाजातलं गाणं रिलीज झालं होतं, ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.
advertisement
दरम्यान, बॉलिवूडकरांना 'एक दिन'च्या माध्यमातून जुनैद आणि साई पल्लवी सारखी फ्रेश जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. 'एक दिन' चित्रपटाविषयी सांगायचं तर, या चित्रपटाच्या माध्यमातून साई पल्लवी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. नितेश तिवारींच्या 'रामायण' चित्रपटाआधी साई पल्लवीचा हा पहिला हिंदी चित्रपट असेल. २०१६ साली रिलीज झालेल्या 'वन डे' या थाई चित्रपटाचा हा रिमेक आहे. आमिर खान प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. सुनील पांडे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले असून, याची पटकथा स्नेहा देसाई यांनी लिहिली आहे. 'एक दिन' हा चित्रपट येत्या 1 मे 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
‘Ek Din’चा रोमँटिक ट्रेलर रिलीज, साई पल्लवी आमिर खानच्या लेकासोबत करणार रोमान्स; Video
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement