advertisement

​​Farmer Success Story: आधुनिक पद्धतीने केली डाळिंबाची लागवड, शेतकऱ्याला मिळणार 50 लाखांचे उत्पन्न! Video

Last Updated:

​​Farmer Success Story: बळीराजा पारंपरिक पीक न घेता आधुनिक पद्धतीने शेती करताना दिसत आहे. अशीच काहीशी शेती रविराज भोसले यांनी केली आहे.

+
News18

News18

सोलापूर :- बळीराजा पारंपरिक पीक न घेता आधुनिक पद्धतीने शेती करताना दिसत आहे. अशीच काहीशी शेती सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी गावातील शेतकरी रविराज भोसले यांनी केली आहे. 15 एकरात तीन वेगवेगळ्या जातीच्या डाळिंबाची लागवड केली असून यासाठी त्यांना एकरी 1 ते 2 लाख रुपये खर्च आला आहे. तर सर्व खर्च वजा करून 40 ते 50 लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. या संदर्भात अधिक माहिती शेतकरी रविराज भोसले यांनी 18 शी बोलताना दिली.
पापरी गावातील शेतकरी रविराज भोसले यांनी 15 एकरात डाळिंबाची लागवड केली आहे. भगवा जातीचे डाळिंब 6 एकरजैन भगवा डाळिंब 5 एकर आणि शरद किंग डाळिंब 3 एकर अशा वेगवेगळ्या तीन जातीच्या डाळिंबाची लागवड केली आहे. डाळिंबावर फळकुज, डांबऱ्या, तेल्या यांसारखे रोग पडू नये म्हणून डाळिंबावर त्यांनी इंग्लिश पेपर लावलेला आहे.
advertisement
यामुळे डाळिंबावर रोग येत नाही आणि डाळिंब सुद्धा दिसायला चांगला दिसतो. 15 एकरात 14 बाय सहा या पद्धतीने डाळिंबाची लागवड केली आहे. जवळपास 15 एकरातून 50 टन डाळिंबाचे उत्पादन मिळणार आहेतर या डाळिंब लागवडी एकरी 1 ते 2 लाख रुपये खर्च आला आहे.
advertisement
सध्याच्या स्थितीला डाळिंबाला भाव चांगला असून मार्केटमध्ये दीडशे ते दोनशे रुपये किलो दर डाळिंबाला मिळत आहे. मार्केट मधला भाव बघता 15 एकरातून 40 ते 50 लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याची माहिती शेतकरी रविराज भोसले यांनी दिली. शेतकऱ्यांनी डाळिंबाची लागवड करून योग्य ती काळजी घेतली तर नक्कीच फायदा मिळेल, असा सल्ला डाळिंब शेतकरी रविराज भोसले यांनी दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
​​Farmer Success Story: आधुनिक पद्धतीने केली डाळिंबाची लागवड, शेतकऱ्याला मिळणार 50 लाखांचे उत्पन्न! Video
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement