Agriculture: कमी खर्च, शून्य मशागत तरी भरगोस पिकाची हमी! कशी केली जाते एसआरटी पध्दतीची शेती?

Last Updated:

Agriculture: कमी खर्च आणि मनुष्यबळात भरघोस उत्पन्न देणारी एसआरटी शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. याबाबत जालन्यातील शेतकरी विष्णुपंत गिराम यांनी माहिती दिलीये.

+
Agriculture:

Agriculture: कमी खर्च, शून्य मशागत तरी भरगोस पिकाची हमी! कशी केली जाते एसआरटी पध्दतीची शेती?

जालना: मराठवाड्यातील शेतकरी देखील आपल्या शेतीमध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग करत आहेत. जालन्यातील प्रयोगशील शेतकरी विष्णुपंत गिराम यांनी एसआरटी म्हणजेच ‘सगुना रिजनरेटिव्ह टेक्निक’ या शेती पद्धतीचा अवलंब केला आहे. या माध्यमातून त्यांनी शेतीवरील खर्चावर तर नियंत्रण मिळवलंच आहे, त्याचबरोबर मजूर टंचाईवर देखील मात केली आहे. ही एसआरटी पद्धत नेमकी काय आहे? याबाबत शेतकरी विष्णुपंत गिराम यांच्याकडून लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
शेतीमध्ये वाढता खर्च आणि मिळत असलेले कमी उत्पन्न यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. खर्च आणि हिशोबाचे गणित न बसल्याने कर्जबाजारी होऊन आत्महत्यांचे प्रमाण देखील वाढत आहे. त्यामुळेच वैविध्यपूर्ण पीक पद्धती आणि शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याकडे शेतकऱ्यांचा कल पाहायला मिळत आहे.
advertisement
5 फुटाच्या बेडवर शेती
सगुना रिजनरेटिव्ह टेक्निक अंतर्गत शेतीमध्ये सुरुवातीला पाहिजे तेवढी आंतरमशागत केली जाते. त्यामध्ये नांगरणी, वखरणी, रोटर इत्यादी सर्व साधनांचा वापर केला जातो. त्यानंतर चार किंवा पाच फुटावर बेड पाडले जातात. बेडवर ठिबक सिंचनाची सुविधा शेतकरी करू शकतात. बेडवर वेगवेगळ्या पिकांचे उत्पन्न घेतलं जातं. पिकाची कापणी केल्यानंतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारची आंतरमशागत केली जात नाही.
advertisement
दोनच यंत्रांचा वापर
कापणी केल्यानंतर पिकाची बूट तसेच शेतात ठेवून पावसाळ्यात पुन्हा एकदा त्याच बेडवर नवीन पिकाची लागवड केली जाते. शेतातील तणाचे नियंत्रण हे तणनाशक फवारणीच्या माध्यमातून केले जाते. टोकण यंत्राच्या साह्याने पेरणी आणि फवारणी यंत्राच्या साह्याने तणनाशक फवारणी ही दोनच यंत्रे शेती करताना वापरली जातात. यामुळे शेतीमध्ये मजुरांची टंचाई भासत नाही, असे शेतकरी गिराम सांगतात.
advertisement
शेतकऱ्यांना आवाहन
एसआरटी पद्धतीमुळे शेतीवर होत असलेला अनियंत्रित खर्च नियंत्रणात येतो. जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते, ज्यामुळे उत्पादनात वाढ होते. ही शेती पद्धत ही आनंददायी शेती पद्धत आहे. ज्या पद्धतीने आपल्या शरीरातील रक्तातील हिमोग्लोबिन असते, त्याच पद्धतीने जमिनीसाठी कार्बन काम करतं. जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढल्यास उत्पादनात वाढ होऊन पिकांची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पीक पद्धतीचा अवलंब अवश्य करावा, असं आवाहन विष्णुपंत गिराम यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
मराठी बातम्या/कृषी/
Agriculture: कमी खर्च, शून्य मशागत तरी भरगोस पिकाची हमी! कशी केली जाते एसआरटी पध्दतीची शेती?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement