TRENDING:

जुन्या कपड्यांपासून नवीन वस्तू, पुण्यातील तरुणाच्या स्टार्टअपची कमाल, 50 लाखांची उलाढाल

Last Updated:

pune business success story - स्वप्नील जोशी असे या तरुणाचे नाव आहे. त्याने पुण्यातील नवी पेठ येथे इको रेगेन (eco regain) नावाने ब्रँड तयार करून जुन्या वापरलेल्या जीन्सपासून सुंदर पर्स बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.

advertisement
प्राची केदारी, प्रतिनिधी
advertisement

पुणे : इंजिनिअरिंग करून आयटीमध्ये काम करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, आपली वेगळी वाट धरत त्यामध्ये काम करत वेगळी ओळख निर्माण करण्याचे काम पुण्यातील एका तरुणाने केली आहे आणि आज हा तरुण लाखो रुपयांची उलाढाल करत आहे. जाणून घेऊयात, या तरुणाची प्रेरणादायी कहाणी.

स्वप्नील जोशी असे या तरुणाचे नाव आहे. त्याने पुण्यातील नवी पेठ येथे इको रेगेन (eco regain) नावाने ब्रँड तयार करून जुन्या वापरलेल्या जीन्सपासून सुंदर पर्स बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. प्रत्येक जण हा दरवर्षी नवीन कपडे खरेदी करतो आणि वापरून झाल्यावर ते फेकून दिले जातात किंवा असेच कुठेतरी टाकले जातात. हा प्रश्न निर्माण होत त्याचे काय करायचे हाच विचार डोळ्यासमोर ठेऊन इको रेगेन या व्यवसायाची सुरुवात केली.

advertisement

त्याने आतापर्यंत 22 प्रकारचे प्रॉडक्ट्स बनवले आहेत. यामध्ये ट्रॅव्हल्स बॅग, लॅपटॉप बॅग, पाऊच असे वेगवेगळे प्रॉडक्ट्स हे बनवले जातात. हे बनवण्याचे काम ज्या गरजू महिला आहेत, त्यांना प्रशिक्षण देऊन त्या बनवतात. 6 महिला या सध्या इथे काम करत आहेत आणि महिन्याला 600 ते 800 बॅग बनवल्या जातात.

नाशकात 2 भावांनी सुरू केलं सी फूड रेस्टॉरंट, आईनंही दिली मोलाची साथ, महिन्याला 6 लाखांची कमाई

advertisement

2018 मध्ये याची स्थापना करण्यात आली आणि भारतातील हे असे पहिले स्टोअर आहे, जिथे जुने कपडे देऊन त्यापासून बनवलेले प्रॉडक्ट्स तुम्ही घेऊ शकतात. पुण्यातून आतापर्यंत 80 हजार किलो कपडे जमा केले असून त्यापासून 15 हजारपेक्षा जास्त प्रॉडक्ट्स बनवल्याची माहितीही त्यांनी दिली. इतकेच नव्हे तर फक्त भारतात नाही तर नेदरलँड, ऑस्ट्रेलियामध्ये देखील हे प्रॉडक्ट्स पाठवले जातात.

advertisement

200 रुपयांच्या पाऊचपासून ते 2200 रुपयाच्या ट्रॅव्हल्स बॅग्सही इथे मिळतात आणि या व्यवसायाची वार्षिक उलाढाल ही 30 लाख ते 50 लाखांपर्यंत आहे, अशी माहिती व्यवसायिक स्वप्निल जोशी यांनी लोकल18 शी बोलताना दिली. त्यांचा हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे.

मराठी बातम्या/मनी/
जुन्या कपड्यांपासून नवीन वस्तू, पुण्यातील तरुणाच्या स्टार्टअपची कमाल, 50 लाखांची उलाढाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल