नाशकात 2 भावांनी सुरू केलं सी फूड रेस्टॉरंट, आईनंही दिली मोलाची साथ, महिन्याला 6 लाखांची कमाई

Last Updated:

nashik sea food restaurants - प्रवीण मोरे आणि आनंद मोरे हे दोन्ही भाऊ आणि आई आज नाशिकमध्ये हे हॉटेल चालवत आहे. तसेच या व्यवसायाच्या माध्यमातून ते महिन्याला 5 ते 6 लाख रुपयांपेक्षा जास्त रुपयांची कमाई करत आहेत. नेमकं त्यांनी हे यश कसं मिळवलं, याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा विशेष आढावा.

+
नाशिक

नाशिक बिझनेस सक्सेस स्टोरी

कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
नाशिक - नाशिकच्या 2 भावांनी मिळून आपल्या आईच्या हाताचे जेवण नाशिकमध्ये प्रसिद्ध होण्यासाठी काही वर्षांपूर्वी एक इच्छा त्यांच्या आईकडे मांडली होती आणि आज मॉम्स कोकण कट्टा ह्या रेस्टोरंटच्या माध्यमातून ती पूर्ण सुद्धा झाली आहे. प्रवीण मोरे आणि आनंद मोरे हे दोन्ही भाऊ आणि आई आज नाशिकमध्ये हे हॉटेल चालवत आहे. तसेच या व्यवसायाच्या माध्यमातून ते महिन्याला 5 ते 6 लाख रुपयांपेक्षा जास्त रुपयांची कमाई करत आहेत. नेमकं त्यांनी हे यश कसं मिळवलं, याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा विशेष आढावा.
advertisement
ते सांगतात की, पूर्वीपासून आई-वडील गावाकडे मासे विक्री करायचे. त्यानंतर आलेल्या पैशात ते आपले घर चालवत असत. आमच्या आईच्या हातालाही वेगळीच चव आहे. मोठे झाल्यावर आपल्या आईच्या हाताचे इतके चांगले आणि चविष्ट जेवण आपण नाशिककरांना खाऊ घातले तर त्यांना हे नक्कीच आवडेल. आमच्या मित्रांनाही ही कल्पना आवडली. आमच्या घरी अनेक वेळी आमचे मित्र जेवले असता त्यांनी आईच्या हाताच्या जेवणाचे कौतुक केले. त्यामुळे मित्रांना जेवण आवडत आहे, याचा अर्थ नाशिककरांनाही ते आवडेल या विचारातून 2012 मध्ये आम्ही आईच्या सोबतीने हा व्यवसाय सुरू केला.
advertisement
सुरुवातीला आम्ही इतरांना हे जेवण घरीच ऑर्डर प्रमाणे बनवायचो. हळूहळू या व्यवसायात वाढ होऊ लागली. याची प्रचिती ही अनेक ठिकाणी होऊ लागली. आम्ही दोन्ही भाऊ नोकरीसाठी होतो. त्या ठिकाणी देखील आईच्या जेवणाचा डबा आम्ही घेऊन जात असताना आमच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांना हातच्या हातच्या जेवणाची चव आवडली. यामुळे आमच्या आईच्या हाताच्या जेवणाची चवही हळूहळू सगळीकडे प्रसिद्ध होत होती.
advertisement
यानंतर आम्ही एका छोट्या गाळ्यामध्ये या हॉटेलची सुरुवात केली. त्याठिकाणी देखील उत्तम प्रतिसाद मिळाला. जागा कमी पडू लागली. ग्राहकांची गर्दी वाढू लागली. दूरदूरवरुन नागरिक येऊ लागले आणि त्यामुळे आम्ही काहीच वर्षात एक मोठे रेस्टॉरंट हे सुरू केले. याची सुरुवात आईमुळेच झाली यामुळे या हॉटेलचे नाव मॉम्स कोकण कट्टा असे ठेवावे असे ठेवले.
advertisement
महिलांमध्ये वाढतोय टाईप 2 मधुमेहाचा धोका, वेळीच सावध व्हा, डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला
नाशिकमध्ये कुठेही मिळत नसलेले आणि फार क्वचित प्रमाणात मिळत असलेले सी फूड जेवण म्हणजेच समुद्रातील मासे हे आम्ही या ठिकाणी ठेवण्याची सुरुवात केली. आई पहिल्यापासून मासे विक्रीच्या व्यवसायात असल्याने आईला याबद्दलची संपूर्ण माहिती होती. कुठला मासा चांगला आणि कुठल्याप्रकारे आपण याला बनवू शकतो हे आईला उत्तम पद्धतीने येत असे. त्यामुळे आम्ही या हॉटेलला संपूर्ण सी फुड ठेवण्यास सुरुवात केली.
advertisement
रोज ताजे मासे आम्ही मुंबईवरून मागवतो. या ठिकाणी आमची आई स्वतः या रेस्टॉरंट मध्ये नाशिककरांच्या प्रेमासाठी आपल्या हाताने हे जेवण बनवीत असते. सुरुवातीच्या काळात एका छोट्याशा हॉटेल वरून चालू झालेला हा प्रवास आज नाशिकमध्ये सर्वात मोठे फूड रेस्टॉरंट म्हणून पोहोचला आहे. आज याठिकाणी 80 लोक काम करत आहेत. या व्यवसायाच्या माध्यमातून ते 5 ते 6 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करत आहेत.
advertisement
आम्ही दोघे भाऊ नोकरी करत होतो. परंतु हा वाढता व्याप पाहता ती नोकरी सोडून संपूर्ण वेळ या व्यवसायात घालवावा लागत आहे. आमच्या हॉटेलची चर्चा ही बघता बघता संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचत चालली आहे, असे त्यांनी सांगितले. तुम्हालाही याठिकाणी भेट द्यायची असेल तर तुम्ही याठिकाणी भेट देऊ शकतात. हे हॉटेल जत्रा हॉटेलपासून काही अनंतराव आडगाव शिवारात, मॉम्स कोकण कट्टा म्हणून प्रसिद्ध आहे.
मराठी बातम्या/मनी/
नाशकात 2 भावांनी सुरू केलं सी फूड रेस्टॉरंट, आईनंही दिली मोलाची साथ, महिन्याला 6 लाखांची कमाई
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement