8व्या वेतन आयोगानंतर कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढेल असा प्रश्न फक्त सर्व सामान्य जनता नाही तर खुद्द सरकारी कर्मचाऱ्यांना देखील पडला आहे.जाणून घेऊयात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराचे संपूर्ण गणित असे असते ते...
हल्ल्यानंतर घाबरलेला सैफ, डॉक्टरांना पॅरालिसीसची भीती, ऑपरेशनमध्ये काय झालं?
सरकारी कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर त्यांच्या बेसिक सॅलरीत किती वाढ होईल या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर आज जरी नसले तरी याआधी झालेली वाढ आणि अन्य अहवाल यावरून एक अंदाज काढता येतो. याआधीच्या म्हणजेच 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसी आधारावर अंदाज लावता येतो की, शिपायापासून मुख्य सचिवांपर्यंतच्या सर्व स्तरावरील सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात किती होईल.
advertisement
असे आहे पगार वाढीचे गणित...
7व्या वेतन आयोगानुसार लेव्हल-1 मधील (शिपाई, सफाई कर्मचारी) बेसिक सॅलरी 18,000 रुपये होती, 8व्या वेतन आयोगानंतर 21,300 रुपयांपर्यंत वाढेल असा अंदाज आहे. लेव्हल-2 मध्ये पगार 19,900 रुपयांवरून 23,880 रुपये, लेव्हल-3 मध्ये 21,700 वरून 26,040 रुपये, लेव्हल-4 मध्ये 25,500 वरून 30,600 रुपये, तर लेव्हल-5 मध्ये 29,200 वरून 35,040 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते.
टीम इंडियाला मिळाला नवा कोच, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी BCCIचा धाडसी निर्णय
लेव्हल 6 ते 9
लेव्हल 6 ते 9 या स्तरातील (शिक्षक, ग्रामविकास अधिकारी इ.) कर्मचाऱ्यांचे बेसिक वेतन 35,400 रुपयांवरून 42,480 रुपये (लेव्हल-6), 44,900 वरून 53,880 (लेव्हल-7), 47,600 वरून 57,120 (लेव्हल-8) आणि 53,100 वरून 63,720 रुपये (लेव्हल-9) पर्यंत वाढेल.
लेव्हल 10 ते 12
लेव्हल 10 मधील कर्मचाऱ्यांचे बेसिक वेतन 56,100 रुपयांवरून 67,320 रुपये, लेव्हल-11 मधील पगार 67,700 वरून 81,240 रुपये, आणि लेव्हल-12 मधील पगार 78,800 वरून 94,560 रुपयांपर्यंत होईल.
लेव्हल 13 आणि 14
लेव्हल 13 च्या कर्मचाऱ्यांचे बेसिक वेतन 1,23,100 वरून 1,47,720 रुपये आणि लेव्हल 14 चे पगार 1,44,200 वरून 1,73,040 रुपयांपर्यंत वाढेल.
ना घरचे नोकर, ना करिना, सैफला रुग्णालयात कोणी नेले? रुग्णालयातून आली मोठी अपडेट
लेव्हल 15 ते 18
IAS अधिकारी, सचिव आणि मुख्य सचिव (लेव्हल 15 ते 18) यांचा पगार मोठ्या प्रमाणात वाढेल. लेव्हल 15 चे वेतन 1,82,200 वरून 2,18,400, लेव्हल 16 चे 2,05,400 वरून 2,46,480, लेव्हल 17 चे 2,25,000 वरून 2,70,000, तर लेव्हल 18 चे पगार 2,50,000 वरून 3,00,000 रुपयांपर्यंत होईल.
बेसिकशिवायही वाढ
या ठिकाणी फक्त बेसिक सॅलरीची वाढ दाखवली आहे.याशिवाय महागाई भत्ता आणि इतर भत्ते मिळून कर्मचाऱ्यांची एकूण पगार अधिक असेल. त्यामुळे बेसिक पगार वाढल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या हाती येणाऱ्या पगारात घसघशीत वाढ होईल हे निश्चित.