हल्ल्यानंतर घाबरलेला सैफ, डॉक्टरांना पॅरालिसीसची भीती, ऑपरेशनमध्ये काय झालं? डॉक्टरांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला

Last Updated:

Saif Ali Khan Health Update: अभिनेता सैफ अली खान याच्यावर उपचार करणारे न्यूरोलॉजिस्ट डॉ. नितिन डांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याची प्रकृती स्थिर आहे. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. डॉ. डांगे यांनी रुग्णालयातील सर्व घटनाक्रम सांगितला.

News18
News18
मुंबई: अभिनेता सैफ अली खान यांच्यावर घरात झालेल्या हल्ल्यानंतर त्याला तातडीने मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील न्यूरोलॉजिस्ट डॉ. नितिन डांगे आणि त्यांच्या टीमने सैफवर शस्त्रक्रीया केली. सैफची प्रकृती नेमकी कशी आहे आणि रुग्णालयात आणल्यापासून त्याच्यावर नेमके कसे उपचार केले याची माहिती डॉ. डांगे यांनी दिली.
सैफ अली खान यांची प्रकृती सध्या उत्तम आहे. त्यांना कोणताही प्रॉब्लेम नाही. फक्त दक्षतेसाठी आम्ही त्यांना ICUमध्ये ठेवले आहे. त्यांच्यावर बराच वेळ शस्त्रक्रीया सुरू होती. सकाळी 6 वाजता शस्त्रक्रीया सुरू झाली होती ती 11 पर्यंत चालली होती. सर्व प्रथम आम्ही पाठीवर मणक्याचे ऑपरेशन केले. पाठीवरचा हल्ला फार खोल होता. मज्जातंतूच्या जवळ इजा झाली होती.  या ठिकाणी जो चाकूचा पार्ट घुसला होता तो आम्ही बाहेर काढला, असे डॉ. डांगे यांनी सांगितले.
advertisement
त्यानंतर प्लॉस्टिक सर्जन यांनी सैफच्या हातावर आणि छातीच्या ठिकाणी जी जखम झाली होती तेथे टाके घातले. त्यानंतर आम्ही आयसीयूमध्ये शिफ्ट केले. ते पूर्णपणे स्थिर असून शुद्धीवर आहेत. या हल्ल्यात त्यांना कोणतेही पर्मनंट अशी इजा झालेली नाही. उद्या सकाळी आम्ही त्यांना रुममध्ये शिफ्ट करू, असे डॉ. डांगे म्हणाले.
सैफ अली खानला जेव्हा रुग्णालयात आणले तेव्हा त्यांच्या शरीरावर छोट्या छोट्या जखमा होत्या. पण सर्वात मोठी जखम पाठीवर झाली होती. यामुळे त्यांचा मणका फार दुखत होता. त्यामुळे आधी सिटी स्कॅन केला. त्यात चाकूचा एक लहान तुकडा आत घुसल्याचे दिसले. चाकूचा तुकडा मणक्याची नस असते त्याच्या जवळ होता. आम्हीला भीती होती पॅरालिसीस होऊ नये, म्हणून ऑपरेशन करण्याचे ठरवले. ही सर्जरी फार सूक्ष्म होती. रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा ते शुद्धीत होते. फक्त दुखत असल्यामुळे ते चालू शकत नव्हते. नस दुखावली गेली नव्हती. आम्ही त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या आणि मगच शस्त्रक्रिया केली. सैफ सुरुवातीला घाबरला होता. बऱ्याच जखमा होत्या आणि पाठीवर जखम खोल होती. अशा प्रकारची दुखापत झाल्यावर कोणीही घाबरू शकते. मात्र शस्त्रक्रीया झाल्यानंतर ते फार आनंदी होते असे डॉ.डांगे यांनी सांगितले.
advertisement
चोराने केलेला हल्ला फार खोल होता आणि गंभीर स्वरुपाचा होता. मात्र चांगली गोष्ट म्हणजे यामुळे त्यांना कायस्वरुपी कोणतीही इजा झालेली नाही. हातावर दोन जखमी होत्या ज्या मध्य स्वरुपाच्या होत्या तर मानेवर एक जखम होती. ज्यावर टाके घालून त्या जखमी बऱ्या करण्यात आल्या आहेत. ऑपरेशन झाल्यानंतर ते लगेच शुद्धीवर आल्याचे डॉ.डांगे म्हणाले.
advertisement
सैफ अली खान रिक्षाने हॉस्पिटलला आले होते. जखमी अनेक असल्या तरी फार रक्तस्त्राव झाला नव्हता. रात्री अचानक असा हल्ला झाल्यामुळे ते आणि कुटुंबीय थोडे टेन्शनमध्ये होते.
कधी देणार डिस्चार्ज?
अडीच इंचाचा चाकूचा तुकडा शरीराच्या आत होता आणि तो मज्जातंतूच्या जवळ होता म्हणून आम्ही ऑपरेशन केले.ते लवकरात लवकर बरे होतील असा आमचा प्रयत्न आहे. उद्या रुममध्ये शिफ्ट केले जाईल आणि दोन दिवसात डिस्चार्ज देण्याचा प्रयत्न करू. भविष्यात त्यांना कोणताही त्रास होणार नाही. एका आठवड्यात ते पुन्हा शुटिंग सुरू करू शकतो, असे ही डॉक्टरांनी सांगितले. एका आठवड्यात या सर्व जखमी भरून निघतील असे डॉ.डांगे म्हणाले.
advertisement
जबाब कधी घेणार
रुग्णालयाच्या नियमानुसार पोलिस त्यांचा जबाब घेऊ शकतात. आमच्याकडून पोलिसांना जबाब घेण्याची परवानगी आहे, असे त्यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
हल्ल्यानंतर घाबरलेला सैफ, डॉक्टरांना पॅरालिसीसची भीती, ऑपरेशनमध्ये काय झालं? डॉक्टरांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement