advertisement

सोने-चांदीच्या दरांत अचानक वाढ का? सराफा व्यावसायिकांनी सांगितलं खरं कारण, Video

Last Updated:

Gold Silver Price Hike: गेल्या आठवड्यात सोने - चांदीच्या दरांमध्ये अचानक वाढ झाली. त्यामुळे सराफा व्यापारी व ग्राहक देखील गोंधळात पडले आहेत.

+
सोने-चांदीच्या

सोने-चांदीच्या दरांत अचानक वाढ का? सराफा व्यावसायिकांनी सांगितलं खरं कारण, Video

छत्रपती संभाजीनगर : सोने-चांदीच्या दरांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच सध्याच्या घडीला लग्नसराई सुरु झाली आहे. लग्नसराईच्या काळात अनेकजण सोने-चांदी खरेदी करतात, परंतु दरांमध्ये चढ-उतार सुरू असल्यामुळे ग्राहक खरेदीसाठी फिरकत नाहीत, त्यामुळे विक्रेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
गेल्या आठवड्यात सोने-चांदीच्या दरांमध्ये अचानक वाढ झाली आणि दोन दिवसानंतरच ते कमी देखील झाले. त्यामुळे सराफा व्यापारी व ग्राहक देखील गोंधळात पडले आहेत. सध्या सोन्याचा भाव 1,59,255 तोळा असा आहे, तर चांदी 2,80,000 दरम्यान आहे. सोने-चांदीच्या दरांमध्ये होत असलेल्या चढ-उतारा मागची कारणे काय आहेत? याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी माहिती दिलीये.
advertisement
सोने-चांदी दरांमध्ये चढउताराचं कारण काय? 
अमेरिका-इराणच्या टेरिफ धोरणामुळे सोने-चांदीच्या दरांमध्ये अराजकता निर्माण झाली आणि एकदम सोने-चांदीचे भाव वाढले व दोन दिवसातच पुन्हा ते भाव खाली आले. या सोने-चांदीच्या दरांमध्ये होत असलेल्या चढउतारा मागे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचे कारण आहे. चीनने चांदी निर्यात बंद केली. त्यामुळे चांदी उपलब्ध व्हायला कठीण जात आहे.
advertisement
शुक्रवारी सोन्याचा भाव अचानकच 1,85,000 पर्यंत गेला आणि आता 1,60,000 पर्यंत आला आहे. तर चांदी 4,20,000 पर्यंत गेली होती चांदीचे भाव साधारणपणे 3 लाखांपर्यंत आले असल्याचे छत्रपती संभाजीनगर सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
यापूर्वी सोने-चांदीचे दर किती वाढायचे? 
लग्नसराई असो किंवा इतर दिवसांमध्ये यापूर्वी 1000 ते 2000 पर्यंत दरांमध्ये वाढ होत होती, परंतु सध्याचा आंतरराष्ट्रीय मुद्दा असल्यामुळे हे भाव गगनाला जाऊन भिडले आहेत, व कमी देखील झाले त्यामुळे ग्राहक सोने-चांदी खरेदीला थांबले आहेत. जेव्हा भाव स्थिर होतील त्यावेळेला सोने-चांदीचा व्यापार सुरळीत होईल असे देखील मंडलिक यांनी म्हटले आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
सोने-चांदीच्या दरांत अचानक वाढ का? सराफा व्यावसायिकांनी सांगितलं खरं कारण, Video
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement