भारतीय क्रिकेट संघाला मिळाला नवा कोच, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी BCCIचा धाडसी निर्णय

Last Updated:

Team India News: भारतीय संघ पुढील महिन्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार आहे. या स्पर्धेच्या आधी बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे.

News18
News18
मुंबई: भारतीय क्रिकेट संघासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत भारतीय फलंदाजांची कामगिरी खराब झाली होती. आता भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायची आहे. यासाठी आता बीसीसीआयने तातडीने निर्णय घेतला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने सौराष्ट्रचे माजी फलंदाज सितांशू कोटक यांची गुरुवारी टीम इंडियाचे फलंदाजीचे कोच म्हणून नियुक्ती केली आहे.
ना घरचे नोकर, ना करिना, सैफला रुग्णालयात कोणी नेले? रुग्णालयातून आली मोठी अपडेट
इंग्लंड विरुद्ध होणारी टी-२० आणि वनडे मालिका तसेच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी बोर्डाने तातडीने हा निर्णय घेतला. ५२ वर्षीय कोटक हे अनेक वर्षापासून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फलंदाजीचे कोच आहेत. ते सिनिअर आणि ए टीम सोबत अनेक वेळा परदेशी दौऱ्यावर गेले आहेत. या निर्णयामुळे अभिषेक नायर यांच्यावर दबाव वाढला आहे. नायर सहाय्यक कोच असताना भारताची कामगिरी अतिशय खराब झाली होती.
advertisement
बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की,हे स्पष्ट आहे की अभिषेक नायर यांच्यापासून खेळाडूंना मदत मिळत नाहीय. कोटक मोठ्या कालावधीपासून कोच आहेत आणि खेळाडूंचा त्यांचा विश्वास आहे.
सैफ अली खान आहे क्रिकेट संघाचा मालक, मिळवतो बक्कळ पैसा
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय फलंदाज उघडे पडले. फलंदाजांच्या अनेक त्रुटी समोर आल्या. विराट कोहली ऑफ स्टंपच्या बाहेचे चेंडू खेळून बाद होत होता. कोटक यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये १५ शतकांसह ८ हजारहून अधिक धावा केल्या आहेत.
advertisement
भारतीय संघ २२ जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. त्यानंतर ३ सामन्यांची वनडे मालिका होईल. असे म्हटले जाते की,नायर यांच्या कामगिरीवर बोर्डाची नजर आहे. ते फक्त वरिष्ठ खेळाडूंसाठी उपलब्ध असतात.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी सहाय्यक स्टाफच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. विराट कोहली सारख्या फलंदाजाला जेव्हा अपयश येते तेव्हा या लोकांना जबाबदार धरले पाहिजे होते. भारताच्या सहाय्यक स्टाफमध्ये गोलंदाजीचे कोच म्हणून मोर्ने मार्केल, नेदरलँडचे रियान टेन डोइश हे फिल्डिंग कोच आहेत.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
भारतीय क्रिकेट संघाला मिळाला नवा कोच, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी BCCIचा धाडसी निर्णय
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement