सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात अनेक शेतकरी कमी पाण्यावर येणाऱ्या ड्रॅगन फ्रुटची शेती करत आहेत. शेतकरी उमेश लिगाडे यांनी पिवळ्या रंगाच्या ड्रॅगन फळाची लागवड केली आहे. साधारणपणे 2014 पासून ते लाल ड्रॅगन फ्रुटची लागवड करत आहेत. पण 2021 मध्ये त्यांनी वेगळा प्रयोग म्हणून पिवळ्या ड्रॅगन फ्रुटची लागवड केली. लालच्या तुलनेत पिवळ्या रंगाच्या फळाला चांगली मागणी आहे. त्यामुळे त्याची शेती कशी केली जाते? हेच शेतकरी लिगाडे यांनी सांगितले आहे.
advertisement
महाराष्ट्रातील या गावाची कमाल, पानांच्या शेतीतून शेतकरी मालामाल, पाहा PHOTOS
कशी केली जाते लागवड?
लिगाडे यांची एक ते सव्वा एकर ड्रॅगन फ्रुटची शेती आहे. त्याची हार्वेस्ट पंधरा ते वीस दिवसांमध्ये केली जाते. हे फळ साधारणपणे 700 ते 800 ग्रॅम वजनाचं आहे. एका एकर मध्ये 500 पोल बसतात. प्रत्येक पोलला चार रोपं लावायची. असे 500 पोल याप्रमाणे 2000 हजार झाडं एका एकरात लागतात. लाल ड्रॅगन ज्या पद्धतीने लावतो त्याच पद्धतीने हे पिवळं देखील लावल जातं. पिवळ्या ड्रॅगन फळाचा आकार हा मोठा आहे. तापमान 40 ते 45 अंश गेलं तरी फळ सुकत नाही, असं शेतकरी लिगाडे सांगतात.
कुठल्याही सिझनमध्ये फळ
ड्रॅगन फ्रुटच्या झाडांना नोव्हेंबर आणि मे मध्ये दोन वेळा फक्त शेण खत दिले जाते. बुरशी आणि रोगराईचे प्रमाण हे देखील कमी आहे. जसं लाल ड्रॅगनला आहे त्याच पद्धतीने याचं देखील आहे. नोव्हेंबर पासून पान वाढीचा सिझन सुरु होतो. एप्रिल ते ऑक्टोबर शेवट पर्यंत फ्लॉवरिंग वाढीचा सिझन सुरु होतो. सहा महिने फळ आणि सहा महिने फ्लॉवरिंग वाढीसाठी जातात. यासाठी एक वर्षाचा कालावधी लागतो. ही प्रक्रिया पूर्णपणे नैसर्गिक आहे, असेही उमेश यांनी सांगितलं.
घरामध्ये येईल सुख-समृद्धी; पारिजातकाचं झाड लावताना घ्या ही काळजी
टिकवण क्षमता
लाल रंगाच्या ड्रॅगन पेक्षा पिवळ्या रंगाच्या ड्रॅगन फळाला बाजार भाव हा जास्त मिळतो. लाल रंगाचं फळ हे 100 तर पिवळ्या रंगाच फळ हे 200 रुपये किलोपर्यंत आहे. हा माल बाजारात जास्त दिवस टिकतो आहे. फळाची साल पाहिली तर ती जाड अशी आहे. त्यामुळेच हे फळ आतून मऊ पडत नाही. लवकर खराब देखील होत नाही. या फळाची शेती करणं सोपं आहे. यामुळे शेतकऱ्यांनी याची लागवड करावी. यातून आर्थिक उत्पन्न देखील चांगले मिळतं. कमी खर्चात जास्त उत्पन्न हे ड्रॅगनच्या शेतीतून मिळत आहे, अशी माहिती शेतकरी लिगाडे यांनी दिली आहे.
कशा पद्धतीची लागते जमीन?
ड्रॅगन फळाच्या वाढीकरिता उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी. तसेच वालुकामय मध्यम हलकी पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन अतिशय चांगली असते. अशा जमिनीत झाडांची वाढ भारी जमिनीतील झाडांपेक्षा चांगली असते. फळांची उत्तम प्रत व जास्त उत्पादनासाठी जमिनीत सेंद्रीय खतांचा पुरवठा करणे आवश्यक असते. ड्रॅगन फळाची लागवड मुळ्या फुटलेल्या, कापलेल्या तुकड्यापासून करतात. योग्य नियोजन पद्धतीचा अवलंब करून ड्रॅगनची शेती उत्तमरित्या करता येते. तसंच कमी खर्चात जास्त उत्पन्न देखील या शेतीतून मिळवता येतं. या फळाला बाजारात चांगली मागणी देखील मिळते, असंही शेतकरी सांगतात.