कसा घ्याल या योजनेचा लाभ
पीएम कुसुम सोलार योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी सगळ्यात आधी mahaurja.com असं सर्च करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरचण ही वेबसाईट ओपन होईल. उजवीकडे "महाकृषि ऊर्जा अभियान कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी" हा पर्याय दिसेल. त्याच्यावर क्लिक करायचं आहे.
आणि या योजनेचा अधिक माहिती यासाठी लागणारे कागदपत्रे कशाप्रकारे या वेबसाईटवर अपलोड करायचे आहेत. यासाठी https://www.youtube.com/watch?v=CBZU7sDYJio ही युट्युब लिंक देण्यात आली आहे.
advertisement
राज्यात केळीची अडीच कोटी रोपं पडून, पाहा काय आहे कारण?
अनुदान कसं दिलं जातं?
3 एचपी पंप
एकूण किंमत – 1,93,803 रुपये
सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा– 19,380 रुपये
एससी/एसटी प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा -9,690 रुपये
5 एचपी पंप
एकूण किंमत– 2,69,746 रुपये
सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा – 26,975 रुपये
एससी/एसटी प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा -13,488 रुपये
7.5 एचपी पंप
एकूण किंमत – 3,74,402 रुपये
सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा – 37,440 रुपये
एससी/एसटी प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा -18,720 रुपये
या योजनेसाठी पात्रतेचे निकष पुढीलप्राणे
1. पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी.
2. शेततळे, विहीर, बोअरवेल, नदी/ याच्या शेजारील शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी.
3. अटल सौर कृषी पंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप अंतर्गत लाभ न मिळालेले शेतकरी.