रायबरेली : गेल्या काही वर्षांपासून शेतीची पद्धत बदलली आहे. लोक आता परंपरागत शेतीच्या तुलनेत इतर पिकांची शेती करण्यासाठी प्राधान्य देत आहेत. त्यामुळे कमी खर्चात चांगली शेती कशी करता येईल, यासाठी लोकांचा कल वाढला आहे. त्यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. आज अशाच एका शेतकऱ्याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
बाबू लाल मौर्या असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते उत्तरप्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील शिवगढ येथील रहिवासी आहेत. त्यांनी परंपरागत शेती सोडून बागायती शेती करण्याचा निर्णय घेतला आणि ते त्यातून चांगला नफा कमावत आहेत.
advertisement
बाबू लाल मौर्या हे आपल्या एक एकर जमिनीवर मागील 5 वर्षांपासून खिऱ्याची शेती करत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शेतीच्या माध्यमातून आधीच्या तुलनेत चांगला नफा होत आहे. तसेच बाजारात याला मोठी मागणी आहे. विशेष म्हणजे उन्हाळ्यात बाजारात खिऱ्यांची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने चांगल्या दराने त्यांची विक्री होत आहे. यामुळे चांगली कमाई होत आहे.
तब्बल 8 वेळा अपयश, शेवटी नवव्या प्रयत्नात मात केलीच! डॉक्टरची प्रेरणादायी गोष्ट, म्हणाले…
त्यांनी सांगितले की, खीरे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामुळे उन्हाळ्यात लोक जेवणासोबत सलादमध्ये याचा वापर करतात. यामुळे उन्हाळ्यात याला मोठी मागणी असल्याने खीरा 40 ते 50 रुपये प्रतिकिलो दराने विकला जातो.
कमी खर्चात चांगला नफा -
लोकल18 सोबत बोलताना त्यांनी सांगितले की, खिऱ्याच्या लागवडीला एकरी 40 ते 50 हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे खर्चाच्या तुलनेत एका हंगामात 2 ते 2.5 लाख रुपये उत्पन्न मिळते. त्यांचा माल हा रायबरेली आणि लखनऊच्या बाजारात विकला जातो. याठिकाणी त्यांना चांगला भाव मिळतो. इतर पिकांच्या तुलनेत काकडीची शेती जास्त फायदेशीर आहे. कारण कमी खर्चात जास्त नफा मिळवता येतो, असेही त्यांनी सांगितले.
