गया : तुमच्या परिसरातही पाऊस कमी पडतो का, किंवा तुमच्या उत्पन्नातही जर वाढ होत नसेल तर तुमच्यासाठी ही एक महत्वाची बातमी आहे. तुम्ही तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी विभागाच्या पीक विविधीकरण योजनेचा लाभ घेता येईल. त्याअंतर्गत कोरडवाहू बागायती उपक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन पद्धतीने आवळा, लिंबू, बेल, जॅकफ्रूट या फळझाडांची लागवड करण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे.
advertisement
या योजनेच्या माध्यमातून आवळा, लिंबू, बेल आणि जॅकफ्रूट लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. सूक्ष्म सिंचनाद्वारे कमी पावसाच्या भागात फळझाडांना प्रोत्साहन देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
गया येथील मोहडा परिसरातील सोनरा गावातील शेतकरी संजय कुमार सिंह यांनी या योजनेंतर्गत 10 गुंठे क्षेत्रात लिंबू आणि माल्टाची शेती केली. हा परिसर पूर्णपणे नापीक आहे. मात्र, तरीही याठिकाणी आता बागायती शेती केली जात आहे. सुरुवातीला उद्यान विभागाच्या वतीने संजय यांना झाडे देण्यात आली. यानंतर आता मागील तीन वर्षांपासून ते लिंबूची शेती करत आहेत.
मागच्या वर्षापासूनच त्याला फळे येऊ लागली. त्यांच्या शेतात 50 झाडे लिंबाची तर 150 झाडे माल्टाची आहेत. याठिकाणी लिंबाचे वार्षिक उत्पादन 12 क्विंटल आहे. तर माल्टाने आता या वर्षी फळे देण्यास सुरुवात केली आहे आणि मे-जूनमध्ये हार्वेस्टिंग केली जाईल.
लिंबूची प्रजाती कोणती -
संजय यांनी नेपाळी आणि बंगाल प्रजातीच्या लिंबूंची लागवड केली आहे. हे वर्षभर फळ देतात आणि याचा आकारही मोठा असतो. मार्केटमध्ये हा लिंबू बाजारात 800 रुपये प्रतिशेकडा दराने विकला जातो. त्यांनी सांगितले की, नालंदाचे अंतर त्यांच्या घरापासून खूप जवळ आहे. त्यामुळे गया व्यतिरिक्त त्यांचे लिंबूंना नालंदाच्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे. लिंबूच्या शेतीसोबतच संजय हे 30 बिघामध्ये इतर पिकेही घेतात.
कृषी विभागाच्या प्रशिक्षण कार्यक्रमात संजय हे अनकेदा सबौर, आयसीएआर, कृषी विज्ञान केंद्रात सहभागी झाले होते. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, 4 वर्षांपूर्वी ते सबौ कृषी विद्यापीठात प्रशिक्षणासाठी गेले होते. तेथील शास्त्रज्ञांनी लिंबूच्या लागवडीवर भर दिला. तसेच त्याचे फायदे सांगितले. त्यामुळे मग तेथून परतल्यानंतर मी उद्यान विभागाच्या मदतीने आपल्या शेतात 50 लिंबाची झाडे लावली.
सध्या सुरुवात आहे. त्यामुळे फारसे फळ आलेले नाही. मात्र, येणाऱ्या काळात उत्पादन वाढेल आणि उत्पन्नही वाढेल. सध्या 50 झाडांमुळे वर्षाला 70 ते 80 हजार रुपयांची बचत होत आहे. एका झाडापासून सुमारे 50 किलो फळे येतात. काही झाडे लहान आहेत. त्यामुळे त्यावर कमी फळे येत आहेत आणि वार्षिक 12 क्विंटलपर्यंत उत्पादन होत असल्याचे त्यांनी सांगितले.