धाराशिव : अनेकदा शेतकऱ्याला विविध संकटांचा सामना करावा लागतो. त्यातच आता आणखी आणखी उडिदाचे पीक तोट्यात गेल्याने धाराशिवमधील शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. याचबाबत लोकल18 चा आढावा.
धाराशिव जिल्ह्यात यावर्षी पुढील पिकाचा फायदा काही कमी प्रमाणात झाला होता. त्यातच यावर्षी धाराशिव जिल्ह्यात उडदाचे पीक तोट्यात असल्याचे पाहायला मिळत आहे. एक एकर उडीद पिकातून केवळ दीड ते दोन क्विंटलचे उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्चही निघाला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
advertisement
धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन पाठोपाठ उडीदाचा पेरा मोठ्या प्रमाणात असतो. परंतु यावर्षी अतिवृष्टी आणि पावसाची मोठी उघडीप असल्याने उडदाच्या उत्पादनात मोठी घट निर्माण झाली आहे.
गणेशोत्सवात गावी जात आहात, पण ट्रॅव्हल्सचे दर पाहिलेत का, संपूर्ण आकेडवारी
उडीद शेती क्षेत्रातले एक महत्त्वाचे पीक आहे. शेतकऱ्यांना आर्थिक ताकद देणारे हे पीक आहे. खरिपातील पीक हे शेतकऱ्यांची नगदी पिके म्हणून ओळखली जातात आणि त्यातील प्रमुख नगदी पीक म्हणून उडीद या पिकाला देखील ओळखले जाते. मात्र, यावर्षी उडीद पिकाचा तोटा शेतकऱ्याला सहन करावा लागत आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामात सुरुवातीच्या काळात चांगला पाऊस झाला. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने उघडीप दिली. तर उडीद काढण्याच्या वेळी अतिवृष्टी झाली आणि फुलोराच्या अवस्थेत उडीद असताना पावसाने उघडीप दिली. यामुळे उडदाच्या उत्पादनात मोठी घट निर्माण झाली आहे. त्यामुळे एकरी दोन क्विंटलपर्यंतचा उतार उडीदाच्या पिकाला येत आहे. सध्या बाजारपेठेत उडिदाला 6000 पासून ते 8000 पर्यंत प्रतिक्विंटल दर मिळत आहे.