Pune News : दिव्यांग, वृद्ध भाविकांसाठी कौतुकास्पद उपक्रम; गणपती दर्शनादरम्यान मिळणार ही सुविधा, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
पुण्यात गणपती दर्शनासाठी येणारे सर्वजण मानाच्या पाचही गणपतीला जात असतात. तेथे दर्शन घेतात. मात्र, बाप्पाच्या दर्शनासाठी दिव्यांग किंवा वृद्ध भक्तांना यावेळी अनेक तास उभे राहावे लागते. अशावेळी या पाचही मानाच्या गणपतीचे दर्शन या भक्तांना घेता येणार आहे.
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे : सर्वत्र उत्साहात गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. दरवर्षी महाराष्ट्रात सर्वत्र सार्वजनिक गणोशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. विशेषत: पुण्यात गणेशोत्सवाची मोठी धूमधाम पाहायला मिळत असते. पुण्यातील मानाचे पाच गणपती आणि भाऊ रंगारी गणपती, दगडूशेठ गणपती, मंडईचा गणपती, बाबूगेनू गणपती असे इतर प्रसिद्ध गणपती हे गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरतात.
10 दिवसांच्या या गणेशोत्सवादरम्यान पुण्याच्या कानाकोपऱ्यांतून आणि बाहेरगावाहूनही भाविकांची येथे दर्शनासाठी गर्दी होते. यामध्ये काही दिव्यांग, वृद्ध भाविकदेखील असतात. त्यांची दर्शनाची सोय व्हावी, यासाठी पुण्यातील आर. के. सामाजिक संस्थेच्या वतीने व्हीलचेयर देऊन या भाविकांना दर्शनासाठी पर्याय मिळवून दिला आहे.
advertisement
पुण्यात गणपती दर्शनासाठी येणारे सर्वजण मानाच्या पाचही गणपतीला जात असतात. तेथे दर्शन घेतात. मात्र, बाप्पाच्या दर्शनासाठी दिव्यांग किंवा वृद्ध भक्तांना यावेळी अनेक तास उभे राहावे लागते. अशावेळी या पाचही मानाच्या गणपतीचे दर्शन या भक्तांना घेता येणार आहे.
advertisement
अशा भक्तांच्या सेवेसाठी हा स्तुत्य उपक्रम पुण्यात राबवण्यात येत आहे. या भक्तांना दर्शनासाठीचा मार्ग उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे आर. के. सामाजिक संस्थेच्या भाग्यश्री साळुंखे यांनी सांगितले.
Ganeshotsav Pune : तुळशीबाग मंडळाचा उपक्रम, यंदाच्या वर्षी तयार केला जगन्नाथ पुरीचा देखावा, VIDEO
दिव्यांग आणि वृद्ध भाविकांची गैरसोय होणार नाही. यासाठी कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी मंदिर, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती, केसरीवाडा गणपती या पाचही मानाच्या गणपतीच्या दर्शनासाठी वृद्ध आणि दिव्यांग भाविकांसाठी दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यामुळे या भाविकांना देखील या गणेशउत्सवात आनंदाने सहभागी होता येईल. दरम्यान, या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 10, 2024 1:34 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : दिव्यांग, वृद्ध भाविकांसाठी कौतुकास्पद उपक्रम; गणपती दर्शनादरम्यान मिळणार ही सुविधा, VIDEO