मुंबई: कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) जगातील कामकाजाची रचना वेगाने बदलत आहे आणि या बदलाबाबत AI तज्ज्ञ स्टुअर्ट रसेल यांनी मोठी आणि गंभीर इशारा दिला आहे. रसेल यांच्या मते, AI प्रणाली आता अशा जवळजवळ प्रत्येक कार्यात सक्षम होत आहेत. जे आजपर्यंत मानवी कौशल्याचे क्षेत्र मानले जात होते. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, भविष्यात एकही व्यवसाय सुरक्षित राहणार नाही, अगदी अत्यंत उच्च प्रशिक्षित क्षेत्र जसे की सर्जरी देखील यापासून सुटणार नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, AI-आधारित रोबोट फक्त सात सेकंदात सर्जरी शिकून मानवी सर्जनपेक्षा अधिक कुशलतेने ऑपरेशन करू शकतो.
advertisement
रसेल यांनी पुढे असेही म्हटले की, या संकटाचा प्रभाव फक्त कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित नाही, तर तो आता थेट कंपन्यांच्या CEOs पर्यंत पोहोचला आहे. भविष्यात अशीही वेळ येऊ शकते की कंपनीचा बोर्ड आपल्या CEO ला स्पष्टपणे सांगेल, “जर तुम्ही निर्णयक्षमता AI प्रणालीला दिली नाही, तर आम्हाला तुमची जागा बदलावी लागेल. कारण स्पर्धक कंपन्यांमध्ये AI-आधारित नेतृत्व अधिक चांगले परिणाम देत असेल.
80% बेरोजगारीचा धोका
रसेल यांनी ही स्थिती जागतिक पातळीवर येणाऱ्या मोठ्या संकटाची पूर्वसूचना असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या अंदाजानुसार, जग 80% बेरोजगारीच्या भीषण परिस्थितीकडे सरकत आहे. त्यांच्या या इशाऱ्यानंतर उद्योगजगतामध्ये चिंता वाढणे निश्चित मानले जात आहे.
स्टुअर्ट रसेल याआधीही अनेक तज्ज्ञांनी अशाच धोक्यांची नोंद केली आहे. काही दिवसांपूर्वी गूगलचे CEO सुंदर पिचाई यांनीही म्हटले होते की, “भविष्यात AI CEO ची भूमिकाही निभावू शकतो.” त्यांनी मान्य केले की, AI संबंधी चिंता आता फक्त तांत्रिक क्षेत्रापुरत्या मर्यादित नसून त्या थेट नेतृत्व आणि निर्णयप्रक्रियेच्या केंद्रबिंदूपर्यंत पोहोचल्या आहेत.
