TRENDING:

BA मॅकेनिकल रसवंतीवाला, दिवसा विकतो इतके कप, नोकरीपेक्षा डबल कमाई

Last Updated:

आज अनेक तरुण उच्च शिक्षण घेतल्यानंतर शहरांमध्ये नोकरीच्या मागे धाव घेतात. परंतु आकाश चव्हाणने नोकरीच्या मागे न लागता घरच्या व्यवसायातच करिअर घडवण्याचा निर्णय घेतला.

advertisement
पुणे : आज अनेक तरुण उच्च शिक्षण घेतल्यानंतर शहरांमध्ये नोकरीच्या मागे धाव घेतात. मात्र काही तरुण असेही असतात, जे पारंपरिक व्यवसायात नवकल्पनांची जोड देऊन यशस्वी उद्योजक बनतात. असंच एक उदाहरण म्हणजे पुण्यातील दत्त रसवंती गृह शिवाजीनगर भागात गेली 40 वर्षे सुरू असून आज आकाश चव्हाण या तरुणाने त्याची धुरा सांभाळली आहे. मूळ गाव जेजुरी असलेल्या आकाशने बी.ए. (मेकॅनिकल) पर्यंत शिक्षण पूर्ण केलं, परंतु नोकरीच्या मागे न लागता घरच्या व्यवसायातच करिअर घडवण्याचा निर्णय घेतला.
advertisement

आकाशच्या आजोबांनी 40 वर्षांपूर्वी 50 पैसे-1 रुपयांमध्ये उसाचा रस विकून या व्यवसायाची सुरुवात केली होती. पुढे वडिलांनी ती चालवली आणि आता आकाश या व्यवसायाची तिसरी पिढी म्हणून चालवत आहे. पारंपरिक पद्धतीने चालणाऱ्या या गुऱ्हाळात आता आधुनिकतेचा स्पर्श आहे. केवळ उसाचा रसच नाही, तर लिंबू पाणी, कोकम सोडा यांसारखी इतर पेयेही येथे उपलब्ध आहेत.

advertisement

शेवग्याच्या पानातून समृद्धी! सादिकानं बदलली गावाची आणि स्वतःची लाईफ, महिना कमवते 1 लाख

आज 250 मिली रसाचा एक ग्लास 20 रुपयांना विकला जातो आणि दिवसाला सुमारे 500 ग्लास विक्री होते. त्यातून दिवसाला जवळपास 10 हजार रुपयांची उलाढाल होते. या व्यवसायात आकाशला त्याचे आई-वडील पूर्ण मदत करतात.

advertisement

आकाश चव्हाण यांची ही प्रेरणादायी वाटचाल नव्या पिढीला दाखवते की, उच्च शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे धावण्याऐवजी पारंपरिक व्यवसायात नवकल्पनांच्या आधारे मोठे यश मिळवता येते. ग्रामीण उद्योगात संधी कशा निर्माण करता येतातयाचे हे उत्तम उदाहरण आहे.

मराठी बातम्या/मनी/
BA मॅकेनिकल रसवंतीवाला, दिवसा विकतो इतके कप, नोकरीपेक्षा डबल कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल