TRENDING:

Success Story : आयटीतील नोकरी सोडली, आता आनंद विकतायत पोहे, महिन्याला 3 लाखांची उलाढाल

Last Updated:

आयटी क्षेत्रात तब्बल 29 वर्षांचा अनुभव, लाखो पगाराची नोकरी सोडून पुण्यातील आनंद अभ्यंकर यांनी कांदे पोह्यांचा व्यवसाय सुरू केला आहे.

advertisement
पुणे: आयटी क्षेत्रात तब्बल 29 वर्षांचा अनुभव, लाखो पगाराची नोकरी सोडून पुण्यातील आनंद अभ्यंकर यांनी कांदे पोह्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. तीन महिन्यांपूर्वी त्यांनी या व्यवसायाची सुरुवात केली आहे. विप्रो कंपनीत ते मॅनेजर होते. पण स्वतःच काहीतरी करायचं या इच्छेतून त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला. सध्या त्यांच्या ‘कांदे पोहे आणि बरंच काही’ या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळत असून महिन्याला तब्बल 3 लाखांची उलाढाल होत आहे. त्यांच्या या प्रवासाविषयी त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
advertisement

आनंद अभ्यंकर यांनी सांगितले की, 29 वर्षांचा आयटीचा अनुभव असून चांगल्या पगाराची नोकरी असताना हा निर्णय घेणं खूप धाडसी होतं. पण अनेक वर्षांपासून स्वतःचं काहीतरी करायचं मनात होतं, त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. ‘कांदे पोहे आणि बरंच काही’ या फ्रँचायझी अंतर्गत पुण्यातील नाशिक फाटा या ठिकाणी हा व्यवसाय सुरू केला. गुणवत्ता चांगली ठेवली असल्यामुळे फक्त तीन महिन्यांत ग्राहकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळू लागला.

advertisement

First Pani Puri Pune : पुण्यातील पहिलं पाणीपुरीचं दुकान! तब्बल ११५ वर्षांचा इतिहास; 'या' प्रसिद्ध पाणीपुरीवर पुणेकर का फिदा आहेत?

महिन्याला 3 लाखांची उलाढाल

याठिकाणी सध्या 8 हून अधिक प्रकारचे पोहे मिळतात. यामध्ये इंदोरी पोहे, मटकी पोहे, दही पोहे, तरी पोहे, कांदे पोहे, दुधी पोहे आणि पनीर पोहे यांचा समावेश आहे. याशिवाय बटाटा वडा, समोसा, कचोरी, आलू पराठा, पुरी भाजी, मिसळ असे पदार्थही येथे मिळतात. त्याच्याच जोडीला चहा, कॉफी, लिंबू चहा, कोल्ड कॉफी, आईस टी तसेच मस्तानीही ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. सध्या या व्यवसायातून त्यांची महिन्याला 3 लाखांची उलाढाल होत आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Success Story : आयटीतील नोकरी सोडली, आता आनंद विकतायत पोहे, महिन्याला 3 लाखांची उलाढाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल