पुणे : पुणे शहराची ओळख केवळ शैक्षणिक, सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक वारशापुरती मर्यादित नसून, येथील समृद्ध खाद्यसंस्कृतीदेखील तितकीच प्रसिद्ध आहे. मिसळ, भेळ, वडापाव आणि पाणीपुरी यांसारख्या पदार्थांनी पुणेकरांच्या जिभेवर कायमच अधिराज्य गाजवले आहे. या खाद्यपरंपरेतील एक ऐतिहासिक ठिकाण म्हणजे कॅम्प परिसरात असलेले कमल नारायण पाणीपुरी दुकान. तब्बल 115 वर्षांचा इतिहास लाभलेल्या या दुकानाला पुण्यातील सर्वात जुने आणि पहिले पाणीपुरीचे दुकान मानले जाते.



