दुसरा शनिवार सुट्टी, रविवार आणि त्यानंतर आलेली सार्वजनिक सुट्टी अशा सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांनंतर आज बँकांचे कामकाज पूर्वपदावर येईल, अशी आशा सर्वसामान्यांना होती. मात्र, आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आज 'देशव्यापी संप' पुकारला आहे. त्यामुळे आज कामकाजाचा दिवस असूनही बँकांचे दरवाजे उघडणार नाहीत.
बँका का बंद आहेत?
पगारवाढ, पाच दिवसांचा कामाचा आठवडा आणि पेन्शनशी संबंधित काही जुन्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बँक कर्मचारी संघटनांनी या संपाचे हत्यार उपसले आहे. प्रशासनासोबत झालेल्या चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्याने कर्मचाऱ्यांनी आज कामावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सलग चौथ्या दिवशी बँका बंद राहणार असून, चेक क्लिअरन्स आणि रोख व्यवहारांवर मोठा परिणाम झाला आहे.
advertisement
शाखांमधील कामकाज ठप्प:
जर तुम्हाला बँकेत जाऊन रोख रक्कम जमा करायची, नवीन चेकबुक घ्यायचे, केवायसी (KYC) अपडेट करायचे असेल, तर उद्या या कामांसाठी मोठी अडचण येऊ शकते.
चेक क्लिअरन्समध्ये विलंब:
चेक क्लिअर करण्याची प्रक्रिया प्रामुख्याने सरकारी बँकांमार्फतच होते. संपामुळे चेक क्लिअर होण्यास 2 ते 3 दिवसांचा उशीर होऊ शकतो, ज्यामुळे तुमचे पेमेंट अडकण्याची शक्यता आहे.
ATM मध्ये रोख टंचाई:
सलग तीन दिवस बँका बंद राहिल्यामुळे एटीएममध्ये रोख रक्कम संपण्याची शक्यता वाढली आहे. विशेषतः लहान शहरे आणि निवासी भागांतील एटीएम उद्या रिकामे मिळण्याची शक्यता आहे.
कर्ज व सरकारी कामांवर परिणाम:
जर तुमचे कर्ज मंजुरी, बँक एनओसी (NOC) किंवा इतर सरकारी कामे प्रलंबित असतील, तर ती आता बुधवार किंवा गुरुवारपर्यंत पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.
तुमची कामं कशी होणार?
नेट बँकिंग किंवा बँकांच्या अधिकृत मोबाईल अॅपद्वारे तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता. गुगल पे, फोन पे सारख्या सेवा सुरळीत सुरू राहतील. सलग सुट्ट्यांमुळे काही ठिकाणी ATM बंद राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही. जास्तीच्या गर्दीमुळे काही ठिकाणी पैसे संपण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ग्राहकांनो, हे लक्षात घ्या!
ज्या कामांसाठी प्रत्यक्ष बँकेत जाणे अनिवार्य आहे (उदा. नवीन खातं उघडणं, पासबुक प्रिंटिंग, मोठी रोख रक्कम काढणे किंवा सोन्याचे दागिने गहाण ठेवणे), ती कामं आज पूर्ण होऊ शकणार नाहीत. त्यामुळे तुमचा मौल्यवान वेळ आणि हेलपाटा वाचवण्यासाठी आज बँकेत जाणे टाळावे. त्यामुळे आज बँकेत न जाणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. हा संप आज असला तरीसुद्धा तो उद्याही सुरू राहणार आहे का याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
