TRENDING:

विसरा मोठ्या बँकांना, FDवर या बँका देतायत तब्बल 8.25% व्याज; फिक्स डिपॉझिटचे 22 बँकांचे नवे दर

Last Updated:

Banks With Best FD Rates: मुदत ठेवी अर्थात Fixed Depositवर बँकांच्या प्रकारानुसार परताव्याचे दर वेगवेगळे असतात, ज्यात लहान वित्त बँका आघाडीवर असून मोठ्या बँका तुलनेने कमी दर देतात. पाहा कोणत्या बँकेत तुमचे पैसे किती वेगाने वाढतील.

advertisement
मुंबई: गुंतवणूकदारांसाठी मुदत ठेव (Fixed Deposit - FD) हा एक सुरक्षित पर्याय मानला जातो. मात्र सध्या विविध बँकांच्या व्याजात मोठी तफावत दिसून येत आहे. विशेषतः स्मॉल फायनान्स बँका (Small Finance Banks) मोठ्या बँकांच्या तुलनेत अधिक व्याज देत आहेत.
News18
News18
advertisement

तुमच्या गुंतवणुकीवर व्याजाचा थोडासा फरकही दीर्घकाळात मोठा परिणाम करू शकतो. विविध बँकांच्या 1 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी असलेल्या व्याजदरांचा सविस्तर तपशील.

स्मॉल फायनान्स बँका (Small Finance Banks)

या बँका सध्या मुदत ठेवींवर सर्वाधिक व्याज देत आहेत.

बँक व्याजदर (प्रति वर्ष कमाल)
जना स्मॉल फायनान्स बँक 8.25%
ESAF स्मॉल फायनान्स बँक 8.00%
शिवालिक स्मॉल फायनान्स बँक 7.80%
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक 7.50%
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक 7.45%
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक 7.40%
एयू (AU) स्मॉल फायनान्स बँक 7.10%

advertisement

खासगी क्षेत्रातील बँका (Private Sector Banks)

बँक व्याजदर (प्रति वर्ष कमाल)
SBM बँक इंडिया 7.85%
IDFC फर्स्ट बँक 7.50%
आरबीएल (RBL) बँक 7.20%
डीसीबी (DCB) बँक 7.15%
इंडसइंड बँक 7.00%
सिटी युनियन बँक 7.00%

advertisement

सार्वजनिक क्षेत्रातील बँका (Public Sector Banks - सरकारी बँका)

सरकारी बँकांचे व्याजदर खासगी बँकांच्या तुलनेत थोडे कमी आहेत, परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेकजण यांना पसंती देतात.

बँक व्याजदर (प्रति वर्ष कमाल)
पंजाब नॅशनल बँक (PNB) 6.60%
कॅनरा बँक 6.60%
इंडियन बँक 6.60%
युनियन बँक ऑफ इंडिया 6.60%
बँक ऑफ बडोदा 6.45%
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) 6.40%

advertisement

परदेशी बँका (Foreign Banks)

बँक व्याजदर (प्रति वर्ष कमाल)
डॉइश बँक (Deutsche Bank) 7.00%
स्टँडर्ड चार्टर्ड बँक 6.60%
एचएसबीसी (HSBC) बँक 5.50%

advertisement

गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाच्या टिप्स

कालावधीची निवड: हे व्याजदर 1 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी आहेत. गुंतवणुकीपूर्वी कोणत्या ठराविक दिवसांच्या कालावधीसाठी (उदा. 444 दिवस किंवा 777 दिवस) सर्वाधिक व्याज मिळतेय, हे बँकेत तपासून घ्या.

सुरक्षितता: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) उपकंपनीमार्फत (DICGC) प्रत्येक बँकेतील 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना (मुद्दल + व्याज) विमा संरक्षण असते. त्यामुळे स्मॉल फायनान्स बँकांमध्ये गुंतवणूक करताना हा मुद्दा विचारात घ्यावा.

ज्येष्ठ नागरिक: ज्येष्ठ नागरिकांना वरील दरांपेक्षा सामान्यतः 0.50% अधिक व्याज मिळते.

मराठी बातम्या/मनी/
विसरा मोठ्या बँकांना, FDवर या बँका देतायत तब्बल 8.25% व्याज; फिक्स डिपॉझिटचे 22 बँकांचे नवे दर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल