आग्रा : तुम्ही अनेक प्रेमकहाण्या ऐकल्या असतील. काही जणांचे प्रेम हे यशस्वी होते. तर काहींचे प्रेम हे यशस्वी होत नाही. याला विविध कारणे असतात. मात्र, आज आम्ही तुम्हाला एका अशा प्रेमीयुगुलांची कहाणी सांगणार आहोत, जे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
आग्रा येथील रहिवासी रितिक जेकप आणि आसामची रहिवासी असलेल्या श्रीजान यांची ही कहाणी आहे. सुरुवातीला ते दोन्ही जण एकमेकांच्या प्रेमात पडले आणि नंतर दोघांनी लग्न केले. यानंतर आता दोन्ही जण एकमेकांचे बिझनेस पार्टनरही झाले आहेत. हा प्रवास नेमका कसा झाला, हे जाणून घेण्यासाठी लोकल18 च्या टीमने त्यांच्याशी संवाद साधला.
advertisement
रितिक आणि श्रीजान या दोघांनी एक वर्षांपूर्वी आपला स्ट्रीटफूड स्टार्टअप सुरू केला आहे. त्याचे नाव स्ट्रेस मोमोज असे आहे. हे नाव जितके यूनिक आहे, तितकीच या दोघांची कहाणीही यूनिक आहे.
आता केमिकल टाकण्याचीही गरज नाही, फक्त हे एक काम करा, घरात अनेक वर्ष खराब होणार नाही गहू
एकमेकांना लाइफ पार्टनर बनवण्याचा निर्णय -
भांडणातून मैत्री झाली. यानंतर या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले आणि नंतर दोघांनी एकमेकांना लाइफ पार्टनर बनवण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता दोन्ही एकमेकांचा बिझनेस पार्टनर बनले आहेत. 1 वर्षांपूर्वी त्यांनी एमडी इंटर कॉलेजच्या बाजूला रस्त्याच्या कडेवर स्ट्रेस मोमोज नावाने आपले स्टार्टअप सुरू केले आहे. याठिकाणी भेटत असलेल्या मोमोजला त्यांनी कूल मोमोज, अँग्री मोमोज, फॅटी मोमोज, अशी नावे दिली आहेत. याठिकाणी खवय्यांची मोठी गर्दी होत असल्याचे पाहायला मिळते.
एकदा लग्नाआधी श्रीजान हिने रितिकला म्हटले होते की, जर नोकरी मिळाली नाही तर दोन्ही मिळून रस्त्याच्या कडेला मोमोज विकू. श्रीजान आणि रितिक दोघांनी हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. त्यांची पहिली भेट ही नोकरीदरम्यान, हैदराबाद येथे झाली होती. पहिल्या भेटीदरम्यानच दोघांमध्ये कुठल्यातरी गोष्टीवरुन भांडण झाले होते. नंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
...अन् चहावाल्यानं स्टॉलवर लावला PM मोदींचा फोटो, कारण आहे unique
स्ट्रेस आला तर सुरू केले स्ट्रेस मोमोज स्टार्टअप -
लग्नानंतर श्रीजानची नोकरी गेली. त्यानंतर तिने स्टार्टअप सुरू करण्याचा विचार केला. मात्र, त्यांना कोणते ठेवावे, हे कळत नव्हते. यानंतर जो तणाव म्हणजे स्ट्रेस ती अनुभवत होती, त्याच स्ट्रेस स्टार्टअपच्या नावावर तिने स्ट्रेस मोमोज सुरू केला. आता त्यांच्याकडे 8 लोकांची टीम काम करत आहे. या माध्यमातून त्यांना लाखोंचा नफा होत आहे. श्रीजान ही स्ट्रेस मोमोजची फाऊंडर तर रितिक को-फाऊंडर आहे. याठिकाणी लोकांना येथील मोमोज खूपच पसंत पडले असून मोठी गर्दी याठिकाणी पाहायला मिळते.