TRENDING:

PPF, सुकन्या सोडाच, 7 लार्ज कॅप फंड्सने दहा वर्षातच केलं मलामाल, तुमच्याकडे यापैकी कोणता?

Last Updated:

मार्केट अस्थिरतेमुळे लोक शेअर्समधून पैसे काढून म्युच्युअल फंड आणि सोन्याकडे वळत आहेत. टॉप लार्ज कॅप फंड्समध्ये ICICI, Nippon, Canara, SBI, Kotak, HDFC आहेत.

advertisement
मुंबई: सध्या मार्केटची स्थिती अस्थिर आहे. त्यामुळे गुंतवणूक करावी की नाही याची एक भीती आहे. शेअर मार्केटमधील दबाव पाहता लोक हळूहळू शेअर्समधून पैसे काढून घेत आहेत. आपला पोर्टफोलिओ डाव्हर्सिफाय करण्यावर भर देत आहेत. शेअर्सपेक्षा आता लोक सोनं आणि म्युच्युअल फंडकडे वळत आहेत. देशात म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे.
7 लार्ज कॅप फंड्स
7 लार्ज कॅप फंड्स
advertisement

तुम्ही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर इक्विटीमधील सर्वात सुरक्षित म्युच्युअल फंड श्रेणींपैकी एक म्हणजे लार्ज-कॅप फंड. लार्ज कॅप फंड्सकडून मिळणारे रिटर्न्स कमी असले ते स्थिर आहेत. स्मॉल कॅप किंवा मिड कॅपने गेल्या काही वर्षात 35 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स दिले कधी दिले कधी कोसळले आणि नुकसान झालं. मात्र लार्ज कॅप फंड्सने 11-12 टक्के रिटर्न्स दिले आहेत. इतर दोन फंड्सच्या तुलनेत रिस्क कमी आणि अधिक स्थिर असतो.

advertisement

मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंड जेवढे जास्त रिटर्न्स देतात तेवढी जास्त रिस्कही वाढवतात. त्यामुळे तुम्हाला स्थिर रिटर्न्स हवे असतील तर आज असे काही टॉप लार्ज कॅप फंड सांगणार आहोत जे PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेपेक्षाही जास्त रिटर्न्स देतात. सुकन्या समृद्धी आणि PPF मध्ये गुंतवणूक करुन 7 ते 8 टक्के रिटर्न्स मिळतात. शिवाय गुंतवणूक 15 ते 25 वर्षांपर्यंत करावी लागते. त्या तुलनेत लार्ज कॅप फंड्समध्ये 10 वर्षात 11 टक्क्यांपर्यंत स्थिर रिटर्न्स मिळतात.

advertisement

तुमच्या पोर्टफोलिओमध्ये लार्ज कॅप स्टॉक किंवा लार्ज कॅप म्युच्युअल फंडांचा चांगला भाग असावा, जेणेकरून वर्षभर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जास्त चढ-उतार होणार नाहीत. लार्ज कॅप फंड हे असे म्युच्युअल फंड आहेत जे त्यांच्या मालमत्तेच्या ८० टक्क्यांहून अधिक लार्ज कॅप स्टॉकमध्ये गुंतवणूक करतात. देशातले सुरक्षित आणि टॉप 7 लार्ज कॅप फंड्स कोणते आहेत याची लिस्ट समोर आली आहे.

advertisement

'सेबी'चा मोठा निर्णय! शेअर मार्केट ट्रेडिंगचं प्रशिक्षण देताना लाइव्ह ट्रेडिंगचा वापर करण्यास बंदी

1. ICICI Prudential Bluechip Fund

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ब्लूचिप फंडने गेल्या 10 वर्षांत त्यांच्या गुंतवणूकदारांना 12.53 टक्के परतावा दिला आहे. या फंडाची AUM 61714.99 कोटी रुपये आहे.

2. Nippon India Large Cap Fund

advertisement

गेल्या 10 वर्षातील सरासरी रिटर्न्स 12.46 टक्के दिले. या फंडची AUM (stands for Assets Under Management, एकूण सगळ्या असेट्सची मिळून असलेलं मार्केट मूल्य) 34,517.63 कोटी रुपये आहे.

3. Canara Robeco Bluechip Equity Fund

गेल्या 10 वर्षातील सरासरी परतावा 12.07 टक्के या फंडने ग्राहकांना दिला आहे. या फंडचे एकूण AUM 14,196.78 कोटी रुपये आहे.

4. SBI Bluechip Fund

एसबीआय ब्लूचिप फंडमध्ये गुंतवणूकदारांचा कलही जास्त आहे. मागच्या 10 वर्षात 11.62 टक्क्यांच्या हिशोबाने गुंतवणूकदारांना रिटर्न्स दिले आहेत. या फंडची AUM (stands for Assets Under Management, एकूण सगळ्या असेट्सची मिळून असलेलं मार्केट मूल्य) 48062.06 कोटी रुपये आहे.

5. Edelweiss Large Cap Fund

एडलवाईस लार्ज कॅप फंडने गेल्या 10 वर्षांत त्यांच्या गुंतवणूकदारांना 11.40 टक्के रिटर्न्स दिले आहेत. या फंडाची AUM AUM (stands for . Assets Under Management, एकूण सगळ्या असेट्सची मिळून असलेलं मार्केट मूल्य) 1078.11 कोटी रुपये आहे.

6 Kotak Bluechip Fund

इनकम टॅक्स जास्त द्यावा लागतोय? या एका गोष्टीमुळे वाचतील इतके हजार रुपये

कोटक ब्लूचिप फंडने गेल्या 10 वर्षांत त्यांच्या गुंतवणूकदारांना 11.40 टक्के रिटर्न दिले आहेत. या फंडाची AUM AUM (stands for Assets Under Management, एकूण सगळ्या असेट्सची मिळून असलेलं मार्केट मूल्य) 9,025.47 कोटी रुपये आहे.

7. HDFC Large Cap Fund

एचडीएफसी लार्ज कॅप फंडने गेल्या 10 वर्षांत त्यांच्या गुंतवणूकदारांना 11.10 टक्के रिटर्न दिले. या फंडाची AUM AUM (stands for Assets Under Management, एकूण सगळ्या असेट्सची मिळून असलेलं मार्केट मूल्य) 34,847.82 कोटी रुपये आहे.

लार्ज कॅप फंडमध्ये गुंतवणूक का करावी?

स्थिरता: मोठ्या कंपन्यांचे शेअर्स असल्याने बाजारातील अस्थिरतेचा प्रभाव तुलनेने कमी असतो.

दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणूक: लार्ज कॅप फंड्सचे परतावे हळूहळू वाढतात पण टिकावू असतात.

जोखीम कमी: मिड कॅप किंवा स्मॉल कॅप फंड्सच्या तुलनेत यामध्ये जोखीम तुलनेने कमी असते.

परफॉर्मन्सची खात्री: मोठ्या कंपन्यांचे शेअर्स असल्यामुळे सातत्याने चांगला परतावा मिळण्याची शक्यता अधिक असते.(

(डिस्क्लेमर: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणं अत्यंत जोखमीचं आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी कागदपत्रं, नियम, अटी वाचूनच करा. इथं दिलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी कोणत्याही नफातोट्यासाठी जबाबदार राहणार नाही. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)

मराठी बातम्या/मनी/
PPF, सुकन्या सोडाच, 7 लार्ज कॅप फंड्सने दहा वर्षातच केलं मलामाल, तुमच्याकडे यापैकी कोणता?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल