इनकम टॅक्स जास्त द्यावा लागतोय? या एका गोष्टीमुळे वाचतील इतके हजार रुपये
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
विवाहित पती पत्नीला घरभाडं देऊन 1.80 लाख रुपयांपर्यंत करबचत करू शकतो. यासाठी रेंट अॅग्रीमेंट आणि भाड्याच्या रिसीट आवश्यक आहेत. HRA क्लेम करण्यासाठी नियम पाळावे लागतील.
मुंबई: सध्या चालू असलेल्या आर्थिक वर्षाचे शेवटचे दोन महिने बाकी आहेत. त्यामुळे करदात्यांमध्ये चर्चा आहे ती करबचतीची. करबचत करण्याचे अनेक मार्ग शोधले जातात. त्यांपैकी एक मार्ग विवाहित व्यक्तींना अवलंबता येऊ शकतो. त्यानुसार, पत्नीला घरभाडं देऊन एक लाख 80 हजार रुपयांपर्यंतच्या रकमेवरचा टॅक्स वाचवता येऊ शकतो. त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ या.
विवाहित दाम्पत्यामध्ये पती नोकरदार असेल आणि घर पत्नीच्या नावावर असेल, तर पत्नीला घरभाडं अर्थात रेंट देऊन करबचत करता येऊ शकते. या मार्गाने एक लाख 80 हजार रुपयांपर्यंतच्या रकमेवर कर वाचवता येऊ शकतो. त्यासाठी काय करावं लागेल, याची माहिती घेऊ या.
हाउस रेंट अलाउन्ससाठी हे कागदपत्र महत्त्वाचं
पत्नीसह एक अधिकृत रेंट अॅग्रीमेंट अर्थात भाडेकरार करावा लागेल. त्यात घरभाड्याची रक्कम आणि नियम-अटी निश्चित कराव्यात. रेंट पेमेंट बँक ट्रान्स्फर, चेक किंवा पावतीच्या माध्यमातून करून त्याचे पुरावे सादर करावेत. कारण HRA अर्थात हाउस रेंट अलाउन्स क्लेम करण्यासाठी भाड्याची रिसीट गरजेची असते.
advertisement
किती रुपयांपर्यंत घेता येतो हाउस रेंट अलाउन्स?
मासिक उत्पन्न एक लाख रुपये असेल आणि त्यात वीस हजार रुपये HRA असेल आणि तुम्ही पत्नीला 25 हजार रुपये मासिक घरभाडं देत असलात, तर वार्षिक HRA 2,40,000 रुपये होईल आणि वार्षिक रेंट पेमेंट 3,00,000 रुपये होईल.
advertisement
मूळ वेतनाच्या 10 टक्के रक्कम 1,20,000 रुपये होईल. महानगर अर्थात मोठ्या शहरात 1,80,000 रुपयांपर्यंतचा HRA टॅक्स फ्री क्लेम करता येतो. हा लाभ नियमांनुसार रेंट अॅग्रीमेंट आणि रिसीट यांच्या माध्यमातून प्रमाणित असला पाहिजे.
advertisement
एचआरए कसा काढला जातो?
- एम्प्लॉयरकडून मिळणारा एचआरए
- मेट्रो सिटीमध्ये घरभाड्याच्या 50 टक्के किंवा नॉन-मेट्रो सिटीमध्ये 40 टक्के
- घरभाड्यातून बेसिक सॅलरीच्या 10 टक्के रक्कम घटवून उरलेली रक्कम
अर्थात, अशा प्रकारे पती करबचतीसाठी क्लेम करणार असेल, तर पत्नीला तिच्या आयकर रिटर्नमध्ये हाउस रेंटच्या माध्यमातून मिळालेलं उत्पन्न दाखवावं लागेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 30, 2025 11:12 AM IST