advertisement

EPFO New Rules: सरकारने PFवर दिली सर्वात मोठी अपडेट, क्लेम केल्यानंतर फक्त इतक्या दिवसात मिळणार पैसे

Last Updated:

EPFO New Rules: पीएफ काढण्याची प्रक्रिया अधिक जलद करत कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता ऑनलाइन क्लेम केल्यास सरासरी अवघ्या आठ दिवसांत पीएफची रक्कम थेट बँक खात्यात जमा होत आहे.

News18
News18
नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने 2026 पासून पीएफ पैसे काढण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात वेगवान केली आहे. आता ऑनलाइन पीएफ क्लेम केल्यास, सरासरी फक्त आठ दिवसांत रक्कम थेट बँक खात्यात जमा होत आहे. सरकारने संसदेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती समोर आली आहे.
याआधी पीएफ काढण्यासाठी अनेक आठवडे, कधी कधी महिनेही लागत होते. कागदपत्रांची पडताळणी, नियोक्त्याची (Employer) मंजुरी आणि मॅन्युअल प्रक्रिया यामुळे मोठा विलंब होत असे. मात्र आता डिजिटल प्रणाली, आधार-आधारित पडताळणी आणि ऑटोमेशनमुळे हा कालावधी लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.
ऑनलाइन क्लेमचा फायदा कोणाला?
नोकरी सोडलेले, नोकरी बदललेले किंवा पीएफ काढण्याची गरज असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही सुविधा अत्यंत दिलासादायक ठरत आहे. क्लेम सबमिट केल्यानंतर तो पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रक्रिया केला जातो आणि साधारण आठ दिवसांत पैसे खात्यात जमा होतात. मात्र यासाठी काही अटी पूर्ण करणं आवश्यक आहे.
advertisement
काय आहे ‘सिंपल जॉइंट डिक्लेरेशन’ प्रक्रिया?
EPFO ने गेल्या वर्षी सदस्यांची माहिती दुरुस्त करणं सोपं व्हावं म्हणून सिंपल जॉइंट डिक्लेरेशन प्रोसेस सुरू केली होती. जर तुमचं EPF खाते आधारशी लिंक असेल आणि KYC पूर्ण असेल, तर नियोक्त्याच्या मंजुरीशिवायही ऑनलाइन क्लेम सेटल होऊ शकतो.
यासोबतच, फेस ऑथेंटिकेशनद्वारे UAN तयार व सक्रिय करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचारी स्वतःच UAN जनरेट करू शकतात.
advertisement
क्लेम सेटलमेंटमध्ये मोठी वाढ
EPFO च्या डिजिटल सुधारणांमुळे क्लेम सेटलमेंटमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
2023–24: 5.98 कोटी क्लेम
2024–25: 7.70 कोटी क्लेम
2025–26 (23 जानेवारीपर्यंत): 8.53 कोटी क्लेम
तसंच ऑनलाइन सेवा विनंत्यांमध्येही मोठी झेप घेतली आहे. मेंबर प्रोफाइल दुरुस्तीच्या विनंत्या 2023–24 मध्ये 66 हजार होत्या, त्या 2025–26 मध्ये 27 लाखांहून अधिक झाल्या आहेत.
advertisement
EPFO 2.0 अंतर्गत युनिफाइड पोर्टल आणि फील्ड ऑफिस अ‍ॅप्लिकेशनमुळे क्लेम, KYC, पेन्शन पेमेंट आणि नियोक्त्यांच्या फाइलिंग प्रक्रिया अधिक सोप्या झाल्या आहेत. नवीन डिजिटल मॉड्यूल्समुळे मॅन्युअल काम कमी झालं असून पारदर्शकता वाढली आहे.
पीएफ लवकर मिळण्यासाठी काय लक्षात ठेवाल?
UAN नेहमी ॲक्टिव्ह ठेवा
आधार आणि बँक खाते EPF खात्याशी लिंक ठेवा
KYC पूर्ण आणि अपडेट ठेवा
advertisement
अडचण आल्यास EPFO पोर्टलवर स्टेटस तपासा किंवा ग्रिव्हन्स नोंदवा
भविष्यात UPI द्वारे पीएफ काढण्यासारख्या आणखी सुविधा येण्याची शक्यता आहे. मात्र सध्या आठ दिवसांत पीएफ मिळणं हेच कर्मचाऱ्यांसाठी मोठं यश मानलं जात आहे.
पूर्वी जिथे 20 दिवसांपेक्षा जास्त वेळ लागत होता, तिथे आता अवघ्या आठ दिवसांत पैसे खात्यात येत आहेत. यामुळे लाखो कर्मचाऱ्यांचं आर्थिक नियोजन सोपं झालं आहे. पीएफ काढायचा असल्यास युनिफाइड पोर्टलवर लॉगिन करून क्लेम दाखल करा आणि अटी पूर्ण असल्यास पैसे लवकर मिळतील, असं EPFOचं म्हणणं आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
EPFO New Rules: सरकारने PFवर दिली सर्वात मोठी अपडेट, क्लेम केल्यानंतर फक्त इतक्या दिवसात मिळणार पैसे
Next Article
advertisement
EPFO New Rules: सरकारने PFवर दिली सर्वात मोठी अपडेट, क्लेम केल्यानंतर फक्त इतक्या दिवसात मिळणार पैसे
सरकारने PFवर दिली सर्वात मोठी अपडेट, क्लेम केल्यानंतर इतक्या दिवसात मिळणार पैसे
  • सरकारची मोठी घोषणा

  • नोकरी सोडली की 8 दिवसांत पैसा हातात

  • अशी आहे संपूर्ण प्रोसेस

View All
advertisement