मुंबई: 2026 साठी भारतीय शेअर बाजारात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे चित्र दिसत आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते, पुढील काळात बाजारात तेजी कायम राहण्याची शक्यता असून काही विशिष्ट क्षेत्रांतील शेअर्स या तेजीचा मोठा फायदा घेऊ शकतात.
तज्ज्ञांच्या ‘मार्केट आउटलुक’ नोट्सनुसार, निफ्टीचा बुलिश अंदाज 2026 मध्ये थेट 29,200 पर्यंत पोहोचू शकतो. ही संभाव्य तेजी प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय व्यापार करारांबाबत सकारात्मक तोडगा निघण्याच्या अपेक्षांमुळे असू शकते. बाजारासाठी हा एक महत्त्वाचा ट्रिगर ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
advertisement
विश्लेषकांच्या मते, बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स (BFSI) क्षेत्रातील शेअर्सना या तेजीचा विशेष फायदा होण्याची शक्यता आहे. यामागे देशाची स्थिर GDP वाढ आणि परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची (FII) बाजारात संभाव्य पुनरागमन ही प्रमुख कारणे सांगितली जात आहेत.
याशिवाय FMCG, हेल्थकेअर, पॉवर आणि टेक्नोलॉजीसारख्या डिफेन्सिव्ह आणि व्याजदर-संवेदनशील (रेट-सेंसिटिव्ह) क्षेत्रांमध्ये ‘शॉर्ट कव्हरिंग’ पाहायला मिळू शकते. याचा अर्थ असा की, जसे-जसे बाजारातील मंदीची पोझिशन बंद केली जाईल. तसतसे या क्षेत्रांतील शेअर्समध्ये अल्पकालावधीत जोरदार उसळी दिसून येऊ शकते.
दरम्यान ऑटोमोबाईल, टेलिकॉम आणि कॅपिटल गुड्स क्षेत्रातील शेअर्समध्ये देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांकडून (DII) सातत्याने खरेदी सुरू असल्याचे दिसून येते. ही खरेदी भारताच्या मध्यम ते दीर्घकालीन आर्थिक वाढीबाबत गुंतवणूकदारांचा असलेला विश्वास स्पष्टपणे दर्शवते.
2026 साठी टॉप स्टॉक पिक्स
मार्केट आउटलुकमध्ये काही निवडक दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य शेअर्सची यादी देण्यात आली असून, त्यांच्यासाठी टार्गेट किंमत आणि स्टॉप-लॉस स्तरही निश्चित करण्यात आले आहेत.
बँक ऑफ इंडिया (Bank of India) साठी टार्गेट किंमत 180 रुपये असून, स्टॉप-लॉस 115 रुपये ठेवण्यात आला आहे.
मारिको (Marico) या FMCG क्षेत्रातील शेअरचा टार्गेट 880 रुपये असून, स्टॉप-लॉस 638 रुपये आहे.
अल्ट्राटेक सिमेंट (UltraTech Cement) साठी 14,500 रुपयांचे टार्गेट देण्यात आले असून स्टॉप-लॉस 9,970 रुपये ठेवण्यात आला आहे.
आयटी क्षेत्रातील दिग्गज टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) साठी टार्गेट 3,775 रुपये असून, स्टॉप-लॉस 2,840 रुपये निश्चित करण्यात आला आहे.
फार्मा क्षेत्रातील आघाडीची कंपनी सन फार्मा (Sun Pharma) साठी टार्गेट 2,180 रुपये आणि स्टॉप-लॉस 1,540 रुपये देण्यात आला आहे.
बाजाराचा एकूण आढावा
एकूणच पाहता भारतीय शेअर बाजाराचा आउटलुक सकारात्मक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सुधारलेले मॅक्रोइकॉनॉमिक वातावरण, संस्थागत गुंतवणुकीचा पाठिंबा आणि वेगवेगळ्या क्षेत्रांतील विशिष्ट ट्रिगर्स हे घटक बाजारातील पुढील तेजीचे प्रमुख चालक ठरू शकतात.
