क्रिप्टो मार्केटमध्ये आज संथ कल दिसत आहेत. मार्केट कॅपच्या हिशेबाने टॉप-10पैकी केवळ दोन क्रिप्टोकरन्सीजमध्येच एक टक्क्यापेक्षा अधिक हालचाल दिसत आहे. त्यात बीएनबी आणि डोजेकॉइनचा समावेश आहे. सर्वांत मोठी क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनची झळाळी सुमारे एक टक्का कमी झाली आहे अणि क्रिप्टो मार्केटमधला दबदबाही घटला आहे. एक बिटकॉइन सध्या 0.94 टक्के घसरणीसह 70,167.84 डॉलर (58.5 लाख रुपये) दरात मिळत आहे. इथेरियम या दुसऱ्या सर्वांत मोठ्या क्रिप्टोकरन्सीचं मूल्य थोडं वाढलं आहे. संपूर्ण क्रिप्टो मार्केटबद्दल बोलायचं झालं, तर गेल्या 24 तासांत जागतिक मार्केट कॅपमध्ये 0.34 टक्के घसरण झाली आहे आणि ती 2.65 लाख कोटी डॉलर्स (220.93 लाख कोटी रुपये) झाली आहे.
advertisement
टॉप 10पैकी केवळ दोन क्रिप्टोकरन्सीजमध्ये साप्ताहिक वेगवान घसरण आहे. एका आठवड्यात अॅव्हलांच दीड टक्क्याहून अधिक कमजोर झाला आहे. त्याशिवाय टेथर आणि यूएसडी कॉइनदेखील रेड झोनमध्ये आहेत; मात्र त्यांच्यातली घसरण किरकोळ आहे. दुसरीकडे, सात दिवसांत सर्वाधिक तेजी डोजेकॉइनमध्ये आली असून, त्याचा दर 36 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. त्यानंतर बिटकॉइन 8 टक्क्यांहून अधिक, बीएनबी 7 टक्क्यांहून अधिक, सोलाना 6 टक्क्यांहून अधिक, कार्डानो सुमारे 5 टक्के आणि इथेरियम तीन टक्क्यांहून अधिक मजबूत झाला आहे. या काळात एक्सआरपी सुमारे एक टक्का उसळला आहे.
टॉप 10 क्रिप्टोकरन्सीजचा कल
क्रिप्टो विद्यमान भाव 24 तासांतला चढ-उतार
बिटकॉइन (BitCoin) 70,167.84 डॉलर (-) 0.94%
इथेरियम (Ethereum) 3,553.32 डॉलर (-) 0.81%
टेथर (Tether) 1.0 डॉलर 0.06%
बीएनबी (BNB) 613.01 डॉलर 4.48%
सोलाना (Solana) 185.81 डॉलर (-) 0.24%
एक्सआरपी (XRP) 0.6277 डॉलर 0.76%
यूएसडी कॉइन (USD Coin) 0.9999 डॉलर (-) 0.03%
डोजेकॉइन (DogeCoin) 0.2167 डॉलर 1.28%
कार्डानो (Cardano) 0.6536 डॉलर 0.31%
अॅव्हलांच (Avalanche) 53.76 डॉलर (-) 0.95%
गेल्या 24 तासांत क्रिप्टोच्या देवाणघेवाणीत घसरण झाली आहे. कॉइनमार्केटवर उपलब्ध आकड्यांनुसार एका दिवसात 9309 कोटी डॉलर्स (7.76 लाख कोटी रुपये) मूल्याच्या क्रिप्टोकरन्सीजची देवाणघेवाण झाली. ती आधीच्या दिवसाच्या तुलनेत 22.57 टक्के कमी राहिली. गेल्या 24 तासांत क्रिप्टो मार्केटमध्ये बिटकॉइनची स्थिती 0.24 टक्के कमजोर झाली आहे आणि क्रिप्टो बाजारात त्याचा वाटा 52.05 एवढा आहे.