TRENDING:

या नव्या पद्धतींनी तुम्ही बंद करु शकता क्रेडिट कार्ड! जाणून घ्या नियम

Last Updated:

How to block Credit Cards: तुम्हाला तुमचे क्रेडिट कार्ड बंद करायचे आहे का? RBI ने क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी काही नियम केले आहेत. त्यांच्या मदतीने, जर बँक किंवा वित्तीय संस्था तुमचे क्रेडिट कार्ड बंद करत नसेल तर ते दंड म्हणून तुम्हाला पैसे देईल. या नियमाचा फायदा कसा घेता येईल हे जाणून घेऊया.

advertisement
मुंबई : तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल आणि ते वापरता येत नसेल, तर तुम्ही ते बंद करू शकता. याशिवाय तुमच्यासोबत फसवणूक होत असेल आणि तुम्हाला ती कायमची थांबवायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. अनेकदा बँक क्रेडिट कार्ड बंद करण्यास टाळाटाळ करते. बँका कार्ड बंद करण्याच्या रिक्वेस्ट लवकर स्वीकारत नाहीत. अशा परिस्थितीत क्रेडिट कार्डवरील आरबीआयचे नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून बँक तुमचे क्रेडिट कार्ड बंद करत नसेल, तर तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या नियमांचा हवाला देऊन कार्ड बंद करण्यास सांगू शकता.
क्रेडिट कार्ड
क्रेडिट कार्ड
advertisement

क्रेडिट कार्डांबाबत RBI च्या नियमांमध्ये म्हटले आहे की, एखाद्या बँकेने क्रेडिट कार्ड बंद केले नाही किंवा उशीर केला तर तिला दररोज 500 रुपये दंड भरावा लागेल. यासाठी काही गोष्टींची माहिती घेणे गरजेचे आहे. तुम्ही बँकेला कोणतीही माहिती न देता कार्ड बंद करण्यास सांगितले तर ते तुम्हाला गोष्टींमध्ये अडकवू शकतात.

परदेशात शिक्षण घेण्याची सुवर्ण संधी! ही बँक देतेय विना गॅरंटी 50 लाखांपर्यंत कर्ज

advertisement

बँक दररोज 500 रुपये दंड भरणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने क्रेडिट कार्ड जारी करणे आणि बंद करणे याबाबत काही नियम केले आहेत. आरबीआयच्या नियमांनुसार, जर एखाद्या ग्राहकाने त्याचे क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी अर्ज केला तर बँकेला 7 दिवसांच्या आत त्यावर काम सुरू करावे लागेल.

बँकेने किंवा कोणत्याही वित्तीय संस्थेने असे न केल्यास पुढील सात दिवसांनंतर संबंधित बँक किंवा वित्तीय संस्था ग्राहकाला प्रतिदिन 500 रुपये दंड भरेल. येथे हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, क्रेडिट कार्डवर कोणतीही थकबाकी असू नये. तुमच्या कार्डवर काही थकबाकी असल्यास बँक तुमची रिक्वेस्ट नाकारेल. सर्व प्रथम तुम्हाला थकबाकी भरण्यास सांगितले जाईल. RBI ने 2022 मध्ये हा नियम लागू केला होता.

advertisement

आयुष्य बदलू शकतो 80-20 चा फॉर्म्युला; गुंतवणूक असो किंवा व्यवसाय होणार नाही नुकसान

ग्राहक सहाय्यता केंद्राशी बोला

तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असलेल्या बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करा आणि तुमचे कार्ड बंद करण्याची रिक्वेस्ट करा.

एसएमएस पाठवा

तुम्ही काही बँकांमध्ये एसएमएसद्वारे क्रेडिट कार्ड ब्लॉक करू शकता. सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर त्या बँकेच्या अकाउंटशी जोडला गेला पाहिजे.

advertisement

नेट बँकिंग/मोबाइल ॲप

तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन करा, क्रेडिट कार्डवर क्लिक करा आणि "ब्लॉक क्रेडिट कार्ड" ऑप्शन निवडा. तुम्ही बँकेच्या मोबाईल ॲपद्वारे क्रेडिट कार्ड बंद करण्याची विनंती देखील करू शकता.

ईमेल

ई-मेलद्वारे कार्ड ब्लॉक करण्यासाठी कस्टमर ग्राहक सेवा पत्त्यावर देखील संपर्क साधू शकतात. कार्डशी संबंधित प्रत्येक माहिती तुम्ही ईमेलमध्ये टाकू शकता.

advertisement

थकबाकी भरणे आवश्यक आहे

कार्डधारकांना कार्डवरील त्यांची सर्व देणी परत करावी लागतील. यामध्ये EMI, कर्ज, बॅलेन्स ट्रान्सफर इत्यादींचा समावेश आहे. सर्व देय रक्कम न भरल्यास बँक तुमचे क्रेडिट कार्ड बंद करणार नाही.

रिवॉर्ड पॉइंट वापरा

क्रेडिट कार्ड व्यवहारातून रिवॉर्ड पॉइंट क्रेडिट कार्डवर जमा होतात. हे कार्डधारकाने वापरले पाहिजेत. कार्ड रद्दीकरण सक्रिय झाल्यानंतर, बँक सर्व पॉइंट रद्द करते.

कँसल झाल्यानंतर कार्ड वापरू नका

क्रेडिट कार्ड ब्लॉक केल्यानंतर ते वापरू नका. तुम्हाला ज्या तारखेला बंद करायचे आहे त्या तारखेच्या एक महिना आधी कोणताही व्यवहार करू नका. यामुळे बँक तुमचे कार्ड तपासेल आणि ब्लॉक करेल. कोणताही व्यवहार बाकी असल्यास तो ब्लॉक केला जाणार नाही.

मराठी बातम्या/मनी/
या नव्या पद्धतींनी तुम्ही बंद करु शकता क्रेडिट कार्ड! जाणून घ्या नियम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल