आयुष्य बदलू शकतो 80-20 चा फॉर्म्युला; गुंतवणूक असो किंवा व्यवसाय होणार नाही नुकसान
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
आयुष्यातले 80 टक्के रिझल्ट्स मुख्यतः 20 टक्के कारणं किंवा इनपुटमधून येतात, असं या फॉर्म्युलात सांगण्यात आलंय.
मुंबई : तुम्ही स्वतःचा बिझनेस करत असलात, गुंतवणूकदार असलात किंवा काही तरी नवीन करण्याचा विचार करत असलात, तर यशस्वी होण्यासाठी तुमच्या आयुष्यात फक्त एक फॉर्म्युला अंमलात आणा. तो पॅरेटो प्रिन्सिपल किंवा 80-20 फॉर्म्युला म्हणून ओळखला जातो. या एका फॉर्म्युलात जीवन बदलण्याची ताकद आहे. गुंतवणुकीतून चांगले रिटर्न मिळवण्यासाठी, स्वतःचा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी हा फॉर्म्युला खूपच उपयुक्त आहे.
आयुष्यातले 80 टक्के रिझल्ट्स मुख्यतः 20 टक्के कारणं किंवा इनपुटमधून येतात, असं या फॉर्म्युलात सांगण्यात आलंय. आयुष्यातला हा सोपा पण शक्तिशाली फॉर्म्युला तुमच्यासाठी गेमचेंजर ठरू शकतो. हा फॉर्म्युला तुम्ही वैयक्तिक आर्थिक स्थिती किंवा गुंतवणुकीत लागू केल्यास तुमचं कधीही नुकसान होणार नाही. गुंतवणुकीतून तुम्हाला चांगले रिटर्न मिळतील. हा फॉर्म्युला तुम्हाला संतुलित जीवन जगण्यासाठीही उपयुक्त ठरेल.
advertisement
इटालियन अर्थशास्त्रज्ञानं तयार केला आहे फॉर्म्युला
इटालियन अर्थशास्त्रज्ञ विल्फ्रेडो पॅरेटो याचं नाव या फॉर्म्युलाला देण्यात आलंय. पॅरेटो यांनी 19व्या शतकात शोध लावला होता, की इटलीतली 80 टक्के जमीन केवळ 20 टक्के नागरिकांच्या ताब्यात आहे. नंतर त्यांनी हा फॉर्म्युला इतर गोष्टींवर लागू केला. त्या वेळी त्याचा निकाल हा आश्चर्यकारक आला. त्यानंतर आर्थिक गुंतवणूक असो, निर्णय असो किंवा व्यवसाय असो, पॅरेटो यांनी हा फॉर्म्युला सर्वत्र यशाचा मूलमंत्र बनवला.
advertisement
हे लक्षात ठेवा
- पॅरेटो फॉर्म्युलानुसार, कोणाचेही 80 टक्के रिटर्न फक्त 20 टक्के गुंतवणुकीतून येतात.
- 20 टक्के खर्च हा तुमच्या 80 टक्के आर्थिक गळतीचं आणि अनावश्यक खर्चाचं कारण असतो.
- बिझनेसमध्ये 20 टक्के ग्राहक तुमच्या उत्पन्नाच्या 80 टक्क्यांचा स्रोत असतात.
- योग्य 20 टक्के गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला तुमची आर्थिक रणनीती काळजीपूर्वक ठरवावी लागेल.
advertisement
- तुमच्या कौशल्याच्या, क्लायंटच्या किंवा उत्पादनाच्या 20 टक्क्यांवर लक्ष केंद्रित करा. तुमच्या उत्पन्नात 80 टक्के वाढ होईल.
कर्जातून होईल सुटका
पॅरेटो यांच्या फॉर्म्युलानुसार, कर्ज तुमच्या आर्थिक यशात मोठा अडथळा ठरतं. अशा परिस्थितीत सर्वांत जास्त व्याज आकारणारी 20 टक्के कर्जं ओळखा. यामध्ये क्रेडिट कार्ड आणि पर्सनल लोन यांचा समावेश असतो. अशा परिस्थितीत, ज्या कर्जावर जास्त व्याज आकारणी केली जात आहे, अशा कर्जाची सर्वप्रथम परतफेड करा. तुमच्यासाठी ते फायदेशीर ठरेल आणि कर्जातून लवकर सुटका होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 06, 2025 4:37 PM IST
मराठी बातम्या/मनी/
आयुष्य बदलू शकतो 80-20 चा फॉर्म्युला; गुंतवणूक असो किंवा व्यवसाय होणार नाही नुकसान







