इनकम टॅक्समध्ये मोठी घोषणा
12 लाखांपर्यंत कोणताही कर नाही.
टॅक्स डिटडक्शन - सिनियर सिटीझन आधीपेक्षा दुप्पट सूट दिली जाणार - ५० हजारवरुन आता 1 लाखांपर्यंत सूट
इनकम टॅक्स नियमांना अधिक सोपं केलं जाणार
मिडल क्लासवर फोकस करण्यात आलं आहे
सबका साथ सबका विश्वास सबका प्रयास आणि सबका विश्वास - मोदी सरकारचं धोरण
advertisement
TDS लिमिट वाढून 6 लाखांपर्यंत करण्यात आलं आहे
रेंटचं वर्षाला TDS लिमिट 2.4 लाखवरुन 6 लाखावर करण्यात आलं आहे.
टॅक्स रिटर्न फायलिंग लिमिट वाढवून 2 वर्षांवरुन 4 वर्षांपर्यंत करण्यात आली आहे.
सीनियर आणि व्हेरि सिनियर सीटीझनसाठी खास गिफ्ट
नवीन इनकम टॅक्स बिल पुढच्या आठवड्यात आणणार
बजेटमधून बिहारसाठी खास गिफ्ट
कृषी सेक्टरसाठी बजेटमधून मोठ्या घोषणा
तूर, उडीद, मसूर यांचे उत्पादन वाढविण्यावर भर
मखाना बोर्ड स्थापन करणार
बिहारच्या मखाना शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणाक
शेतकऱ्यांना शेतीसाठी योग्य मोबदला द्यावा
मत्स्य उत्पादनाला चालना देण्यावर भर द्यावा
अर्थसंकल्पात १० प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणार
अर्थसंकल्पात निर्यातीवर विशेष भर दिला जाईल.
बजेटचे गंतव्यस्थान विकसित भारत आहे.
अर्थसंकल्पात कर सुधारणांवर भर
बजेटचे गंतव्यस्थान विकसित भारत आहे.
एमएसएमई आणि निर्यातीला प्रोत्साहन देण्यावर भर
अर्थसंकल्पात वीज क्षेत्र आणि खाणकामावर लक्ष केंद्रित केले जाईल.
कृषी विकासामुळे ग्रामीण समृद्धी वाढेल
बजेटचं वाचन आणि शेअर मार्केटवर परिणाम
बजेटचं वाचन सुरू असताना शेअर मार्केटमध्ये उसळी, निफ्टी 50 ग्रीन झोनमध्ये, निफ्टी बँक ग्रीन झोनमध्ये, सेन्सेक्स वधारला
बजेट वाचायला सुरुवात
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून बजेट वाचायला सुरुवात
बजेट सादर करण्याआधी विरोधकांचा गोंधळ
विरोधकांकडून संसदेत गदारोळ, मोठ्याने घोषणा, बजेट सुरू होण्याआधीपासूनच विरोधकांचा गोंधळ
बजेटला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी
बजेटला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळाली आहे. आता थोड्याच वेळात अर्थसंकल्प सादर होणार आहे.
राष्ट्रपती भवनात पोहोचल्या
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेट सादर करण्याआधी राष्ट्रपतींची भेट घेतली. त्यांच्यासोबत संवाद साधला. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि तिथे बजेट मंजूर केलं जाईल त्यानंतर संसदेत बजेट सादर होणार आहे.
कसा असेल कार्यक्रम?
10.15 मिनिटांची केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार, 11 वाजता संसदेत बजेट सादर केलं जाणार आहे. दुपारी 2 वाजता राज्यसभेचं कामकाज सुरू होईल. दुपारी 4 वाजता निर्मला सीतारमण यांची पत्रकार परिषद होणार आहे.
महाराष्ट्राला काय मिळणार?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज संसदेत सादर करणार देशाचा अर्थसंकल्प, अर्थसंकल्पातून मुंबई आणि महाराष्ट्राला काय मिळणार याकडे लक्ष.
सर्वसामान्य लोकांना आयकरमधून दिलासा मिळणार का?
अर्थसंकल्पात कोणत्या नव्या घोषणा होणार याकडे नोकरदार वर्गाचं लक्ष, यंदा तरी करपात्र उत्पन्न मर्यादेत वाढ होणार का याची उत्कंठा
बजेटमधून काय महाग, काय स्वस्त?
यंदा काय स्वस्त आणि काय महाग होणार याकडे तमाम देशवासियांचं लक्ष, तर अर्थसंकल्पातून मुंबई आणि महाराष्ट्राला काय मिळणार याचीही उत्कंठा.
शेअर मार्केटचा मूड कसा आहे?
अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच गिफ्ट निफ्टीमध्ये थोडीशी घसरण दिसून येत आहे.
मुंबई: देशाचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प मांडणार आहेत. या अर्थसंकल्पात प्राप्तिकरासंदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. नोकरदार करदात्यांपासून ते महिला आणि वृद्धांपर्यंत सर्वांनाच अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पातून मध्यमवर्गाला मोठा दिलासा मिळू शकतो अशीही शक्यता आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य नागरिकांना, करदात्यांना काय दिलासा मिळणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. तसंच शेतकरी, व्यापाऱ्यांसाठी अर्थसंकल्पात काय तरतूद असेल हेही पाहावं लागेल. देशाच्या अर्थसंकल्पावर करदाते आणि सर्वसामान्य जनतेचं आर्थिक गणित ठरत असतं. त्यामुळे लोकसभेत सादर होणारे बजेटमधून सर्वसामान्यांना काय मिळणार हे पाहणं औत्स्युक्याचं ठरणार आहे.
