TRENDING:

चीनचा 'गोल्डन' गेम प्लॅन, युद्धाच्या छायेत गुप्त तयारी; सोन्याच्या किमतीत येणार मोठा भूकंप? पडद्यामागून आर्थिक फिल्डिंग

Last Updated:

China Long Term Strategy: चीन सलग 17 महिन्यांपासून दीर्घकालीन आर्थिक रणनीती आखत आहे. अमेरिकन डॉलरला जमिनीत गाडण्याच्या या छुपी रणनीती आता जगभर चर्चा होत आहे.

advertisement
बीजिंग: जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने शांतपणे पण सातत्याने आपली आर्थिक ताकद वाढवण्याचा मार्ग स्वीकारला आहे. कोणताही गाजावाजा न करता चीनने सलग 17 महिन्यांपासून गुप्त डाव खेळत आहे. या हालचालीकडे जागतिक बाजार आणि अर्थतज्ज्ञांचे लक्ष वेधले गेले आहे.
News18
News18
advertisement

जग जिथे जलद निर्णयांमध्ये अडकलेले आहे तिथे चीन मात्र शांतपणे मोठी आर्थिक तयारी करत आहे. कोणताही गाजावाजा न करता सलग 17व्या महिन्यात People's Bank of China सोने खरेदी करत आहे. मार्च अखेरपर्यंत चीनचा सोन्याचा साठा वाढून 74.38 दशलक्ष ट्रॉय औंसपर्यंत पोहोचला आहे. मात्र यात एक महत्त्वाचा ट्विस्ट आहे तो म्हणजे सोने वाढले असले तरी त्याची एकूण किंमत (व्हॅल्यू) कमी झाली आहे.

advertisement

फेब्रुवारीमध्ये हा साठा 74.22 दशलक्ष ट्रॉय औंस होता म्हणजेच मार्चमध्येही खरेदी सुरूच राहिली. पण त्याचवेळी सोन्याच्या साठ्याची एकूण किंमत फेब्रुवारीतील 387.59 अब्ज डॉलरवरून मार्चमध्ये 342.76 अब्ज डॉलरपर्यंत घसरली. त्यामुळे वरवर पाहता नुकसान झाल्यासारखे वाटत असले तरी या मागे एक दीर्घकालीन रणनीती दडलेली आहे.

चीन सध्या घाईत कोणतेही मोठे निर्णय घेत नाही किंवा बाजाराला धक्का देण्याचा प्रयत्न करत नाही. मात्र पडद्यामागे मोठ्या प्रमाणावर सोने खरेदीचा खेळ सुरू आहे. दर महिन्याला थोड्या-थोड्या प्रमाणात सोने खरेदी करत चीन आपला साठा मजबूत करत आहे.

advertisement

तज्ज्ञांच्या मते चीन आपल्या परकीय चलन साठ्याला (फॉरेक्स रिझर्व्ह) फक्त अमेरिकन डॉलरवर अवलंबून ठेवू इच्छित नाही. सध्याच्या जागतिक परिस्थितीत विशेषतः वाढते भू-राजकीय तणाव, अमेरिकेची धोरणे आणि मध्यपूर्वेतील अस्थिरता डॉलरवर पूर्ण अवलंबित्व धोकादायक ठरू शकते.

अशा परिस्थितीत सोने हा असा मालमत्ता प्रकार (asset) आहे जो कोणत्याही एका देशाच्या धोरणांवर किंवा चलनावर अवलंबून नसतो. त्यामुळे चीन दीर्घकालीन सुरक्षिततेच्या दृष्टीने सातत्याने सोन्याचा साठा वाढवत आहे. ही रणनीती नवीन नसली तरी तिचा परिणाम दीर्घकाळात दिसून येतो. जिथे इतर देश अल्पकालीन चढ-उतारांमध्ये अडकतात तिथे चीनसारखे देश दीर्घकालीन खेळ खेळतात.

advertisement

या प्रक्रियेचा जागतिक बाजारावरही परिणाम होत आहे. चीनसारखा मोठा देश सातत्याने सोने खरेदी करत असल्याने जागतिक मागणी मजबूत राहते आणि सोन्याच्या किमतींना आधार मिळतो. मात्र साठ्याच्या मूल्यामध्ये झालेली घट हे दाखवते की बाजार नेहमी स्थिर नसतो. किमती सतत बदलत असतात आणि त्यानुसार साठ्याचे मूल्यही चढ-उतार करत असते.

चीनचा फोकस सध्याच्या परिस्थितीवर नसून पुढील 5 ते 10 वर्षांवर आहे. हा भाग केवळ सोन्याचा साठा करण्यापुरता मर्यादीत नाही तर एक मोठी आर्थिक रणनीती आहे. ज्यात चीन शांतपणे आपली आर्थिक ताकद वाढवत आहे. जेणेकरून भविष्यातील कोणत्याही जागतिक धक्क्यांचा प्रभाव कमी करता येईल.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
चीनचा 'गोल्डन' गेम प्लॅन, युद्धाच्या छायेत गुप्त तयारी; सोन्याच्या किमतीत येणार मोठा भूकंप? पडद्यामागून आर्थिक फिल्डिंग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल