क्रेडिट कार्ड बंद करण्याचे तोटे
तुम्ही एखादं क्रेडिट कार्ड बंद करू शकता. पण, त्यानंतर तुमच्याकडे असलेल्या इतर कार्डांच्या वापराचं प्रमाण वाढेल. अशा परिस्थितीत तुमच्या क्रेडिट स्कोअरवर वाईट परिणाम होऊ शकतो. या उलट, तुम्ही तुमचं क्रेडिट कार्ड सुरू ठेवल्यास, ते तुमचा युटिलायझेशन रेशो टिकवून ठेवण्यास मदत करेल आणि तुमचा क्रेडिट स्कोअर अधिक चांगल्या स्थितीत राहील. कार्ड बंद केल्याने तुमच्या अकाउंटचं सरासरी वय कमी होतं. शिवाय तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो. जर तुमच्या कार्डवर ॲन्युअल किंवा रिन्यूअल फी आकारली जात नसेल तर असं कार्ड बंद केल्याने तुमचा तोटा होऊ शकतो. जर अचानक तुमचा खर्च वाढला तर हे कार्ड तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतं.
advertisement
क्रेडिट कार्ड बंद करण्याचे फायदे
जर तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या क्रेडिट कार्डसाठी फी भरावी लागत असेल आणि त्याचा जास्त वापरही होत नसेल तर ते बंद करण्यास हरकत नाही. जर तुमच्याकडे असलेल्या कार्ड्सची संख्या जास्त असेल आणि ते मॅनेज करणं कठीण वाटत असेल तुम्ही काही कार्डं बंद करू शकता. पण, कोणतंही कार्ड बंद करण्यापूर्वी त्यात जमा झालेले रिवॉर्ड पॉईंट्स आणि कॅशबॅकचा फायदा घ्या.
अनेकदा काही एजंट आणि बँका तुम्हाला संपूर्ण माहिती न देता क्रेडिट कार्ड देण्याचा प्रयत्न करतात. साधारणपणे मार्केटमध्ये क्रेडिट कार्डवर उपलब्ध असलेल्या सर्व सवलती आणि रिवॉर्ड पॉइंट्सबद्दल सांगितलं जातं. पण, क्रेडिट कार्ड मिळाल्यानंतर त्यावर कोणते चार्जेस आकारले जातील याबाबत कोणीही सांगत नाही. क्रेडिट कार्ड कंपन्या किंवा बँका वेगवेगळ्या चार्जेसच्या नावाखाली युजर्सकडून पैसे उकळतात. तुमच्याकडेही क्रेडिट कार्ड असेल किंवा नवीन क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर त्यावर तुम्हाला कोणते चार्जेस भरावे लागतील, याबाबत माहिती असणं महत्त्वाचं आहे.