तुम्ही मिनिमम 1000 रुपये आणि मॅक्सिमम 2 लाख जमा करू शकता
एमएसएससीला 7.5 टक्के व्याज मिळत आहे. या योजनेंतर्गत तुम्ही किमान 1000 रुपये आणि कमाल 2 लाख रुपये जमा करू शकता. ही स्किम 2 वर्षात पूर्ण होते. तसंच, तुम्ही अकाउंट उघडण्याच्या तारखेपासून 1 वर्षानंतर पात्र बॅलेन्सचं 40 टक्के रक्कम काढू शकता. या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर महिला सन्मान बचत प्रमाणपत्र अकाउंट कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडू शकता.
advertisement
2 लाख रुपये जमा करा आणि 32,000 रुपयांचे गॅरंटेड व्याज मिळवा
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत तुम्ही 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करू शकत नाही. तुम्ही 2 लाख रुपये देखील जमा केल्यास तुम्हाला या रकमेवर 7.5 टक्के व्याज मिळेल. यानुसार तुमच्या पत्नीला मॅच्युरिटीवर एकूण 2,32,044.00 रुपये मिळतील. म्हणजे तुमच्या पत्नीला 2 लाख रुपयांच्या ठेवीवर एकूण 32,044 रुपये व्याज मिळेल.
Income Tax: 90,000 लोकांना पुन्हा भरावा लागणार इनकम टॅक्स, काय आहे कारण?
मुलगी किंवा आईच्या नावाने अकाउंट उघडता येते
तुम्ही अद्याप विवाहित नसल्यास, तुम्ही तुमच्या आईच्या नावाने महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेतही गुंतवणूक करू शकता.