पानाची साधारणपणे किंमत 20 रुपये ते 40 रुपयांपर्यंत आहे. विशेषतः या जय भवानी पान सेंटरवरील पान लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत परिवारातील सर्वजण निश्चिंतपणे हे पान चाखू शकतात. पान सेंटर व्यवसायाच्या माध्यमातून टेकाळे यांची महिन्याला 2 ते 2.50 लाख रुपयांची उलाढाल होते, तर निव्वळ नफा 80 ते 90 हजार रुपये मिळतो. मेहनत, नवीन कल्पना आणि दर्जेदार सेवा यामुळे कमी कालावधीत ग्राहकांचा विश्वास जिंकला असल्याचे टेकाळे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
Success Story : बाप-लेकाचा रोजगार गेला, हार न मानता सुरू केला व्यवसाय, महिन्याला 2 लाख कमाई
नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांना टेकाळे यांनी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे, पान सेंटर किंवा कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी बाजाराचा सखोल अभ्यास करा. पान कसे तयार केले जाते, कोणते प्रकार लोकप्रिय आहेत हे स्वतः शिका. व्यवसायासाठी योग्य ठिकाण निवडा, जिथे लोकांची वर्दळ आहे. सातत्याने चांगली सेवा दिल्यास यश नक्की मिळते.