मुंबई : जर तुम्हाला तात्काळ रोख रकमेची गरज असेल तर सोने विकणे हा सर्वात जलद मार्ग आहे. ज्वेलर्स किंवा गोल्ड बायर्सकडून तुम्हाला ताबडतोब पैसे मिळू शकतात. मात्र चांगली किंमत मिळवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी रेट तपासावे लागतील.
गोल्ड लोनदेखील बँक किंवा एनबीएफसी (NBFC) कडून काही तासांत मिळू शकतो. फक्त अट आहे की तुमचं KYC आणि सोन्याचं मूल्यांकन (Valuation) तयार असेल. जर तुम्हाला तात्काळ पैसा हवा असेल आणि पेपरवर्क टाळायचं असेल, तर सोने विकणे योग्य ठरेल. अन्य प्रकरणांत दोन्ही पर्याय जवळजवळ समान गतीने काम करतात.
advertisement
सोने ठेवायचं की विकायचं?
हेच सर्वात मोठं निर्णयाचं ठिकाण आहे. सोने विकल्यावर तुम्ही त्या दागिन्यांचं मालकत्व कायमचं गमावता. गोल्ड लोन घेतल्यावर तुम्ही सोने गहाण ठेवता आणि हप्त्यांचं पेमेंट पूर्ण केल्यानंतर परत मिळवता. जर सोन्याला कौटुंबिक किंवा भावनिक मूल्य असेल, तर गोल्ड लोन हा सुरक्षित पर्याय ठरतो.
खर्चाच्या दृष्टीने बघितलं तर –
-गोल्ड लोनवर ८% ते १२.५% वार्षिक व्याज आणि प्रोसेसिंग फी आकारली जाते.
-सोने विकल्यावर व्याज नसतं, पण रोख रक्कम ही अनेकदा बाजारभावापेक्षा कमी मिळते.
अधिक फायदा आणि जोखीम
आरबीआयच्या नियमांनुसार (ऑगस्ट 2025) गोल्ड लोनसाठी LTV रेश्यो 75% ते ८५% आहे. म्हणजेच सोन्याच्या संपूर्ण किमतीएवढा लोन मिळत नाही. सोने विकल्यावर बाजारभावाच्या जवळपास पैसे मिळतात. जोखमीच्या दृष्टीने, विक्री झाल्यावर व्यवहार संपतो. मात्र गोल्ड लोन घेतल्यास हप्ते वेळेवर न भरल्यास तुमचं सोने लिलावात जाऊ शकतं.
कोणता पर्याय निवडावा?
जर सोन्याला भावनिक मूल्य जोडलेलं असेल किंवा भविष्यात सोन्याच्या किमती वाढतील अशी अपेक्षा असेल, तर गोल्ड लोन योग्य ठरतो. जर जास्तीत जास्त रोख हवी असेल आणि कर्जाचं ओझं उचलायचं नसेल, तर सोने विकणं फायदेशीर ठरतं. शेवटी निर्णय हा तुमच्या आर्थिक उद्दिष्टांवर, सोन्याशी असलेल्या भावनिक नात्यावर आणि परतफेड करण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे.