फास्टॅग काढला तर फायदा काय?
या योजनेअंतर्गत केवळ 3 हजार रुपयांत 200 ट्रिप्ससाठी टोल पास मिळणार आहे. यामुळे प्रवाशांचा दर ट्रिप खर्च फक्त 15 रुपयांपर्यंत कमी होणार आहे. सध्या प्रत्येक टोल क्रॉस करताना FASTag मधून प्रत्येकी 50 ते 80 रुपये वसूल होतात. पण आता वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी सरकारने ही नवीन योजना आणली आहे. 200 फेऱ्या टोल क्रॉस करण्यासाठी सध्या अंदाजे 10 हजार रुपये खर्च येतो, पण आता तो खर्च फक्त 3 हजार रुपयांमध्ये होणार आहे. एका वर्षात तुम्ही कितीही पास काढू शकता.
advertisement
1. कोणत्या टोलवर होईल वापर?
हा वार्षिक पास फक्त राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझांसाठी लागू असेल. राज्य महामार्ग किंवा स्थानिक टोलसाठी हा पास चालणार नाही. म्हणजे दिल्ली-मुंबई किंवा चेन्नई-बंगळुरू अशा राष्ट्रीय मार्गांवर हा पास वापरता येईल. याशिवाय महाराष्ट्रातही 87 पैकी 18 राष्ट्रीय महामार्ग आहेत त्यामुळे तुम्हाला हा पास केवळ तिथेच वापरता येणार आहे.
2. 200 ट्रिप्स नंतर काय?
200 ट्रिप्स पूर्ण झाल्यानंतर वाहनधारकांना पुन्हा FASTag रिचार्ज करावा लागेल किंवा पुन्हा एक नवीन वार्षिक पास घ्यावा लागेल. एका वर्षात तुम्ही कितीही पास घेऊ शकता. त्यासाठी कोणतीही अट तूर्तास ठेवण्यात आलेली नाही. तुम्हाला त्यांच्या वेबसाइटवर जाऊन यासाठी अर्ज करायचा आहे.
WhatsApp मध्ये आलंय खास फीचर! आता मिस होणार नाही कोणताही Unread मेसेज
3. ६० किमी नियमाचा दिलासा:
टोल प्लाझा दरम्यानचे ६० किमीचे अंतर असले तरी वारंवार येणाऱ्या वाहनधारकांसाठी ही योजना मोठा दिलासा देणारी आहे. अनेकांना आठवड्यातून अनेकदा टोल भरावा लागत असल्याने हा वार्षिक पास खूप फायदेशीर ठरणार आहे.
4. पास कसा घ्यायचा?
हा वार्षिक पास मिळवणे खूप सोपे होईल. सरकार लवकरच NHAI (भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वेबसाइटवर आणि महामार्ग प्रवास अॅपवर एक नवीन पोर्टल सुरू करण्याची योजना आखत आहे, जिथून लोक ऑनलाइन अर्ज करू शकतील आणि पास त्यांच्या विद्यमान FASTag अकाउंटशी लिंक करू शकतील.
5. सरकारचा उद्देश काय?
या योजनेमागे वाहतूक सुरळीत करणे, टोलवर गाड्यांची रांग कमी करणे, डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देणे आणि प्रवाशांचा वेळ वाचवणे हा मुख्य उद्देश आहे. ऑफिस किंवा व्यवसायासाठी दररोज प्रवास करणाऱ्या लोकांना या योजनेचा सर्वाधिक फायदा होईल. त्याच वेळी, जे लोक अनेकदा लाँग ड्राइव्ह किंवा रोड ट्रिपवर जातात त्यांच्यासाठी देखील ही एक उत्तम पर्याय ठरेल. हा पास कर्मशियल गाड्यांसाठी नाही तर खासगी गाड्यांसाठी केवळ लागू करण्यात आला आहे.
Fastag Update: FASTag मध्ये मोठा बदल! टोलसोबत पार्किंग, EV चार्जिंग आणि विम्यासाठीही लवकरच नवा नियम
6. महाराष्ट्रातील कोणत्या टोलवर चालेल हा पास?
महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वचे समृद्धी महामार्ग, एक्सप्रेसवे, मुंबई पुणे एक्सप्रेस वे, अटल सेतू यापैकी कुठेही हा पास चालणार नाही. हा पास 18 राष्ट्रीय महामार्गांवर चालणार आहे. याची संपूर्ण यादी NHAI च्या अधिकृत पोर्टल tis.nhai.gov.in वर जावे लागेल. होम पेजवर Toll Plazas या बटणावर क्लिक करा. येथे तुम्हाला At a Glance वर क्लिक करायचं आहे. यानंतर तुमच्यासमोर सर्व टोल प्लाझाची यादी दिसेल.
7. हा पास घेणं फायद्याचं की तोट्याचं?
महाराष्ट्रातील नागरिकांसाठी तर हा पास घेणं तितकंस फायद्याचं ठरेलच असं नाही. तुम्ही कोणत्या भागात राहता, त्यासोबत तुम्ही किती वेळा राष्ट्रीय महामार्गाचा वापर करता यावर हा पास घ्यायचा की नाही ते ठरवणं महत्त्वाचं आहे. तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील नागरिकांसाठी याचा इतका फायदा होईलच असं नाही. त्यामुळे हा पास काढण्याआधी काही गोष्टी नक्की चेक करून घ्या नाहीतर फुकटचे 3000 रुपये अडकायचे.