28 दिवसांपैकी 13 दिवस बँक बंद
फेब्रुवारी 2025 मध्ये बँकांना भरपूर सुट्ट्या असणार आहेत. या महिन्यातील 28 पैकी 8 दिवस बँकांमध्ये कामकाज होणार नाही. शनिवार आणि रविवार या साप्ताहिक सुट्यांव्यतिरिक्त अनेक सण आणि काही महत्त्वाच्या दिवसांमुळे बँका बंद राहणार आहेत. फेब्रुवारीमध्ये 8 दिवस बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही. या 8 दिवसांमध्ये तुम्ही ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून छोटे व्यवहार, काही छोटी कामं करू शकता. शिवाय ATM सुरू असल्याने तुम्ही पैसे देखील काढू शकता. पैसे ट्रान्सफर करण्यासारखी कामं तुम्ही ऑनलाईन App च्या माध्यमातून सोप्या पद्धतीनं करू शकता.
advertisement
RBI कडून यादी जाहीर
भारतीय रिझर्व्ह बँक प्रत्येक कॅलेंडर वर्षात बँक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते. फेब्रुवारीमध्ये देशभरातील बँका 8 दिवस बंद राहणार नाहीत. RBI ने जाहीर केलेल्या सुट्टीच्या यादीतील अनेक सुट्ट्या राष्ट्रीय स्तराच्या आहेत. त्या दिवशी देशभरात बँकिंग सेवा बंद राहतील. काही सुट्ट्या स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवरच्या दिल्या जातात. त्या दिवशी बँकेच्या शाखा फक्त त्या त्या राज्यांमधील बंद राहतात. रविवार व्यतिरिक्त प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
ऑनलाईन बँकिंग सेवा सुरू राहणार
बँकांच्या सुट्ट्यांमुळे ऑनलाइन सेवा सुरू राहतील, काही वेळा महत्त्वाची कामे रखडतात. पण, आता बँकांनी बहुतांश सेवा ऑनलाइन केल्यामुळे फारशी अडचण नाही. विशेष म्हणजे बँकांच्या ऑनलाइन सेवा सुट्टीच्या दिवशीही सुरू राहतात. त्यामुळे, तुम्ही नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग किंवा UPI द्वारे एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित करण्यासह अनेक गोष्टी करू शकता.
बँकेच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी
2 फेब्रुवारी - रविवार
3 फेब्रुवारी 2025 (सोमवार) सुट्ट्यांची संपूर्ण यादी येथे आहे: सरस्वती पूजेच्या निमित्ताने आगरतळा येथे बँका बंद राहतील.
9 फेब्रुवारी - रविवार
11 फेब्रुवारी 2025 (मंगळवार): थाई पूसममुळे चेन्नईमध्ये बँका बंद राहतील.
12 फेब्रुवारी 2025 (बुधवार): शिमल्यात गुरु रविदास जयंतीनिमित्त बँका बंद राहतील.
15 फेब्रुवारी 2025 (शनिवार): इंफाळमध्ये Lui-Ngai-Ni साजरी केली जाईल, त्यामुळे बँका बंद राहतील.
16 फेब्रुवारी - रविवार
19 फेब्रुवारी 2025 (बुधवार): छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बेलापूर, नागपूर आणि मुंबई येथे बँका बंद राहतील.
20 फेब्रुवारी 2025 (गुरुवार): आयझॉल आणि इटानगरमध्ये राज्य स्थापना दिनानिमित्त बँका बंद राहतील.
23 फेब्रुवारी रविवार
26 फेब्रुवारी 2025 (बुधवार): महाशिवरात्रीनिमित्त अहमदाबाद, आयझॉल, बेलापूर, बेंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, डेहराडून, हैदराबाद (आंध्र प्रदेश), हैदराबाद (तेलंगणा), जयपूर, जम्मू, कानपूर, कोची, लखनौ , मुंबई, नागपूर, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर आणि तिरुअनंतपुरममध्ये बँका बंद राहतील.
28 फेब्रुवारी 2025 (शुक्रवार): लोसारच्या निमित्ताने गंगटोक प्रदेशात बँका बंद राहतील.