विश्लेषकांच्या अंदाजानुसार सोन्याचा दर अमेरिकेतील आर्थिक आकडेवारी, रशिया-युक्रेन संघर्षावरील चर्चा आणि व्यापार शुल्क यांवर अवलंबून असेल. मात्र, एकूणच सोन्याच्या भावाचा कल सकारात्मक राहण्याची चिन्हे आहेत. कारण, सप्टेंबरमध्ये होणाऱ्या अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरण बैठकीत व्याजदर कपातीची शक्यता वाढली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदीची रसिकता दिसून येत आहे.
शनिवारी डिसेंबर डिलिव्हरीसाठीच्या कॉमेक्स गोल्ड फ्युचर्समध्ये 1.09% वाढ होऊन सोन्याचा दर 3,418.50 डॉलर प्रति औंस झाला. फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पावेल यांनी जॅक्सन होल परिषदेतील वक्तव्यात लवकरच मौद्रिक धोरणात बदल होऊ शकतो, असे संकेत दिले.
advertisement
यानंतर गुंतवणूकदारांच्या आशा वाढल्या आहेत. अमेरिकन फेडरल रिझर्व्हची पुढील FOMC बैठक 16-17 सप्टेंबरला होणार आहे. पावेल यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या शुल्कांचा अमेरिकेतील किंमतींवर मोठा परिणाम झाल्यास, दरकपात वर्षाअखेरपर्यंत पुढे ढकलण्याचा विचार केला जाण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांच्या मते, मागच्या काही दिवसांमध्ये सोन्याचे दर घसरले आहेत. तर आता गणपतीमुळे पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. पितृपक्षात पुन्हा खाली घसरण्याची शक्यता आहे. मात्र पॉवेल यांच्या मते, सोन्या चांदीच्या किंमती नवे रेकॉर्ड गाठण्याची शक्यता आहे. मल्ल्या यांच्या मते सप्टेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या बऱ्याच घडामोडींचे परिणाम सोन्यावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडी वेट अॅण्ड वॉचची भूमिका निभावावी असं आवाहन केलं आहे.