जर तुम्ही स्वस्त सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आताच संधी असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. वायदे बाजारात काही प्रमाणात नफा वसुली सुरू झाली आहे. त्याच्या परिणामी सोन्याच्या दरात घसरण दिसून आली आहे. या नफा वसुलीमुळे फार मोठी घसरण झाली नाही. मात्र, सोन्याच्या दरात आगामी काही दिवसात वाढ होण्याची शक्यता आहे. अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्ह व्याज दर कपातीची घोषणा करू शकते. त्यामुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक करण्याआधी विचारपूर्वक निर्णय घेण्याची सूचना तज्ज्ञांनी केली आहे.
advertisement
सोनं किती महागणार?
झानेर मेटल्सचे स्ट्रॅटेजिस्ट पीटर ग्रँट म्हणतात की सोने अजूनही "वरच्या ब्रेकआउट पॅटर्न" मध्ये आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोने ५००० डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे आता सोनं काही प्रमाणात स्वस्त आहे. येत्या काळात सोनं महागण्याची शक्यता आहे. सोनं सध्या तरी स्वस्त असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला. सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यास ग्राहकांना फटका बसणार आहे.
सोन्यासाठी ५००० डॉलर प्रति औंस दर आणि ८९ रुपये प्रति डॉलर विनिमय दर गृहित धरल्यास सोन्याचा दर भारतात 1 लाख 66 हजार 875 रुपये इतका होईल.
सामान्य व्यक्तीसाठी याचा अर्थ काय आहे?
व्याजदर कपातीचा थेट फायदा सोन्याला होतो. यूएस फेडरल रिझर्व्ह या महिन्यात बैठक घेत आहे आणि बाजाराला जवळजवळ खात्री आहे की २५-बेस-पॉइंट दर कपात शक्य आहे. ट्रेडर्सकडून या कपातीची ८९ टक्के शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. कमी व्याजदर असेल तर बँक मुदत ठेवींवर कमी परतावा देते. सोन्याच्या गुंतवणुकीचे वाढलेले आकर्षण, म्हणजे जर दर कपात झाली तर किंमत पुन्हा वाढू शकते.
मध्यवर्ती बँका देखील सोने खरेदी करत आहेत. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या मते, जगभरातील मध्यवर्ती बँकांनी ऑक्टोबरमध्ये ५३ टन सोने खरेदी केले - जानेवारी २०२५ नंतरची ही सर्वात मोठी मासिक खरेदी आहे.जेव्हा प्रमुख देश सोने जमा करत असतात, तेव्हा त्यांनाही भविष्यात किमती वाढतील असा आहे, अंदाज एक्सपर्टने व्यक्त केला आहे.
सोनं खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात...
जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल, तर काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. जेव्हा जेव्हा १-१.५% ची थोडीशी घसरण होते, तेव्हा एका वेळ थोडी गुंतवणूक करा. एकाच वेळी संपूर्ण रक्कम गुंतवू नका. याला SIP शैलीतील सोने खरेदी म्हणतात. सोने ही नेहमीच दीर्घकालीन गुंतवणूक असते. त्यामुळे झ़टपट नफ्यासाठी सोन्यात गुंतवणूक नको. दर कपात जाहीर होण्यापूर्वी आणि नंतरही लहान संधी उपलब्ध असतात, याकडेही एक्सपर्टने लक्ष वेधले.
(Disclaimer: ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी असून कोणताही गुंतवणूक विषयक सल्ला नाही. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा.)
