सोने खरेदी करण्यामागची 10 कारणं:
1. ट्रेड वॉर आणि टॅरिफ तणाव:
अमेरिका आणि चीनमधील व्यापारयुद्ध आणि टॅरिफवाढीच्या संघर्षामुळे जागतिक बाजारात अनिश्चितता आहे. पुढील 90 दिवस अत्यंत निर्णायक असतील.
2. सेंट्रल बँकांची प्रचंड खरेदी:
जगभरातील सेंट्रल बँकांकडून मागील 3 वर्षांपासून प्रत्येक वर्षी 1000 टनांहून अधिक सोने खरेदी करण्यात आले आहे. चीनने मार्च 2025 मध्ये सलग 5व्या महिन्यात सोने खरेदी केली आहे.
advertisement
3. स्टॅगफ्लेशनचा धोका:
अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या माहितीनुसार, देशात मंदी आणि महागाई यांचा एकत्रित धोका आहे. अशा स्थितीत सोने नेहमीच चांगली कामगिरी करते.
4. चीनमध्ये गोल्ड ETF गुंतवणूक वाढली:
मार्च 2025 मध्ये चीनच्या गोल्ड ETF मध्ये तब्बल 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली.
5. फेड दर कपात करू शकतो:
2025 मध्ये दोन वेळा व्याजदर कपात होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे डॉलर कमकुवत होईल आणि सोन्याला फायदा होईल.
UPI पेमेंटचे तीन तेरा, लाखो व्यवहार थांबले; २० दिवसांत तिसऱ्यांदा यंत्रणा ठप्प
6. 2000 पासून फक्त 2 नकारात्मक वर्षं:
गेल्या 25 वर्षांत केवळ 2 वर्षं सोने तोट्यात राहिलं आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा अत्यंत विश्वासार्ह पर्याय आहे.
7. जिओपॉलिटिकल तणाव:
रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्रायल-हमास संघर्ष यांसारख्या घटनांमुळे सोनं 'सेफ हेवन' म्हणून लोकप्रिय आहे.
8. चलन तणाव वाढला:
डॉलर निर्देशांक 3 वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे जगभरात सोने स्वस्त झाले आहे.
9. अमेरिकेचे विक्रमी कर्ज:
नोव्हेंबर 2024 मध्ये अमेरिका कर्जाच्या $36 ट्रिलियन पार गेला. हे जागतिक स्तरावर मोठा धोका ठरतो आहे.
10. शेअर बाजारातील अस्थिरता:
2025 मध्ये शेअर बाजार नकारात्मक असून, पोर्टफोलिओमध्ये स्थैर्य आणण्यासाठी सोने अत्यंत उपयुक्त आहे.