UPI पेमेंटची सिस्टीम क्रॅश; PhonePe, Google Payवरील लाखो व्यवहार ठप्प; २० दिवसांत तिसऱ्यांदा यंत्रणा ठप्प

Last Updated:

UPI Outage In India: UPI वापरकर्त्यांना UPI सेवा वापरण्यात अनेक अडचणी येत आहेत. अनेक वापरकर्त्यांनी डाउनडिटेक्टरवर UPI बंद असल्याची तक्रार केली आहे.

News18
News18
मुंबई: शनिवारी सकाळी भारतातील युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) सेवेत मोठ्या तांत्रिक समस्येमुळे व्यत्यय आला. यामुळे देशभरातील वापरकर्त्यांना डिजिटल व्यवहार पूर्ण करता आले नाहीत. या अचानक आलेल्या अडथळ्यामुळे यूपीआयवर अवलंबून असलेल्या अनेक सेवा प्रभावित झाल्या. अनेक वापरकर्त्यांना पेमेंट करता न आल्याने त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक दैनंदिन कामांवर परिणाम झाला.
डाउनडिटेक्टरच्या अहवालानुसार शनिवारी दुपारपर्यंत यूपीआय संबंधित समस्यांच्या सुमारे १,१६८ तक्रारी नोंदवण्यात आल्या. यापैकी गुगल पे (Google Pay) वापरकर्त्यांनी ९६ समस्यांची नोंद केली. तर पेटीएम (Paytm) वापरकर्त्यांनी २३ समस्या नोंदवल्या. यूपीआय संबंधित अधिकाऱ्यांकडून किंवा नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून या ताज्या व्यत्ययाबद्दल अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
20 दिवसांतील तिसरा व्यत्यय:
गेल्या काही दिवसांतील यूपीआय सेवेतील हा तिसरा मोठा व्यत्यय आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांमध्ये चिंता वाढली आहे.
advertisement
12 एप्रिल : सकाळी सुरू झालेल्या या समस्येमुळे हजारो वापरकर्ते त्रस्त झाले.
एका रात्रीत 1 हजार 600 कर्मचाऱ्यांना नारळ दिला, भारतीय कंपनीचा धक्कादायक निर्णय
2 एप्रिल: डाउनडिटेक्टरवर 514 तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. त्यावेळी ५२% वापरकर्त्यांना यूपीआय अॅपद्वारे पैसे पाठवताना (फंड ट्रान्सफर) समस्या येत होत्या. एनपीसीआयने त्यावेळी बँकांच्या यशस्वी पेमेंट दरांमध्ये "उतार-चढाव" असल्याचे मान्य केले होते.
advertisement
इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं; Goldने तोडलं सर्व रेकॉर्ड, 1 लाखासाठी आता हवेत...
26 मार्च: गुगल पे आणि पेटीएम सारख्या लोकप्रिय यूपीआय अॅप्सच्या वापरकर्त्यांना मोठ्या व्यत्ययाचा सामना करावा लागला होता. डाउनडिटेक्टरवर 3,000 हून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या आणि वापरकर्ते सुमारे 2-3 तास सेवा वापरू शकले नव्हते.
वारंवार येणाऱ्या या तांत्रिक अडचणींमुळे दैनंदिन व्यवहारांसाठी यूपीआयवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या वापरकर्त्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. यूपीआय प्रणालीच्या स्थिरतेवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. संबंधित यंत्रणांनी या वारंवारच्या समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याची गरज व्यक्त होत आहे.
मराठी बातम्या/मनी/
UPI पेमेंटची सिस्टीम क्रॅश; PhonePe, Google Payवरील लाखो व्यवहार ठप्प; २० दिवसांत तिसऱ्यांदा यंत्रणा ठप्प
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement