Gold Price: इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं; Goldने तोडलं सर्व रेकॉर्ड, 1 लाखासाठी आता हवेत फक्त इतके रुपये
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Gold Price Today: अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ युद्धाचा परिणाम थेट जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि सोन्याच्या किंमतीवर झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने आज ऐतिहासिक उच्चांक गाठत गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडवून दिली आहे.
मुंबई: अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या टॅरिफ वॉरमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत खळबळ माजली असून याचा थेट परिणाम सोन्याच्या दरांवर दिसून येतोय. दोन्ही आर्थिक महासत्ता संघर्षाच्या स्थितीत असताना, सोन्याच्या किमती आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारात विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी पहिल्यांदाच सोन्याने प्रति औंस 3,200 डॉलर्सची पातळी ओलांडली. त्याचप्रमाणे, एमसीएक्सवर देखील सोन्याचा भाव पहिल्यांदाच प्रति 10 ग्रॅम 93500 रुपयांच्या पुढे गेला आहे.
विक्रमी दर
शुक्रवारी (11 एप्रिल) आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर पहिल्यांदाच 3,200 डॉलर प्रति औंसच्या पुढे गेला. ही सोन्याची इतिहासातील सर्वोच्च किंमत ठरली आहे. त्यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांचे लक्ष आता सोन्याकडे वेधले गेले आहे.
MCXवरही इतिहास घडला
देशांतर्गत मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) मध्येही सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला. शुक्रवारी सोन्याचा दर 93,736 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. 1 एप्रिल रोजी हा दर 91,400 रुपये, 3 एप्रिलला 91,423 रुपये, तर 10 एप्रिलला 92,400 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. म्हणजेच अवघ्या काही दिवसांत सोन्याच्या दरात मोठी उडी झाली आहे.
advertisement
गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी
2024 मध्ये सोन्याने 28 टक्के परतावा (रिटर्न) दिला होता. 2025 च्या सुरुवातीला 2,650 डॉलर प्रति औंस दराने सुरू झालेले सोने आता 3,200 डॉलरच्या पुढे ट्रेड होत आहे. त्यामुळे ज्यांनी यापूर्वी सोने खरेदी केले आहे. त्यांना चांगलाच नफा मिळालेला आहे.
advertisement
तज्ज्ञांचे मत काय सांगते?
PACE360 चे अमित गोयल यांनी मनीकंट्रोलशी बोलताना सांगितले की, गोल्डमध्ये जवळच्या काळात (6 ते 8 महिने) फार मोठा उसळीचा अंदाज नाही. किंमतींवर थोडा दबाव राहू शकतो. पण दीर्घकालीन दृष्टीकोनातून सोन्याचा भविष्यातील ट्रेंड चांगला आहे. येत्या 3 ते 4 वर्षांत सोने 4,000 ते 5,000 डॉलर प्रति औंसपर्यंत जाऊ शकते.
advertisement
महत्त्वाचे मुद्दे:
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर प्रथमच $3,200 च्या पुढे
एमसीएक्सवर प्रति 10 ग्रॅम दर 93,736 चा उच्चांक
2024 मध्ये गोल्डने 28% रिटर्न दिला
3-4 वर्षांत दर $5000 पर्यंत जाण्याचा अंदाज
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 11, 2025 8:11 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Gold Price: इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं; Goldने तोडलं सर्व रेकॉर्ड, 1 लाखासाठी आता हवेत फक्त इतके रुपये