Corruption: शिक्षिकेने ओढणी झटकली अन् मुख्याध्यापक जाळ्यात अडकला, छ. संभाजीनगर शिक्षण विभागात खळबळ
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Vrushali Kedar
Last Updated:
Corruption: तक्रारदार शिक्षिकेने मुख्याध्यापक सोमनाथ भावले याच्याकडे अर्जित रजा मंजूर करण्यासाठी अर्ज केला होता.
छत्रपती संभाजीनगर: शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला देखील भ्रष्ट्राचाराची वाळवी लागली आहे. या क्षेत्रात लाच घेतल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. आयएसओ मान्यता असलेल्या जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने शिक्षिकेला अर्जित रजा मंजूर करून देण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत शिक्षिकेने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केल्याने हा प्रकार समोर आला. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरमधील सातारा गाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुख्याध्यापक सोमनाथ भागोजी भावले (वय 52, राहणार वसंत विहार बीड बायपास) आणि संगणक ऑपरेटर गणेश रामनाथ कोथिंबीरे (वय 26, राहणार सातारा गाव) अशी आरोपींची नावे आहेत. तक्रारदार शिक्षिकेने मुख्याध्यापक सोमनाथ भावले याच्याकडे अर्जित रजा मंजूर करण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, रजा मंजूर करण्यासाठी भावले याने ऑपरेटर गणेश कोथिंबीरेच्या माध्यमातून शिक्षिकेकडे 20 हजार रुपयांची लाच मागितली. लाच देण्याची इच्छा नसल्याने शिक्षिकेने एसीबीकडे तक्रार केली.
advertisement
एसीबीने आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. ठरल्यानुसार शिक्षकीने ऑपरेटर गणेश कोथिंबीरे याच्याकडे 20 हजार रुपये दिले. एसीबीने सांगितल्यानुसार, पैसे देताच शिक्षिकेने ओढणी झटकून पथकाला इशारा दिला. त्याचवेळी पथकाने आरोपींना रंगेहाथ पकडलं. त्यांच्याकडून 20 हजार रुपये आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई अधीक्षक माधुरी कांगणे, उपाधीक्षक संगीता पाटील यांच्या पथकातील जमादार सचिन बारसे यांनी केली. या प्रकरणी सातारा गाव पोलीस स्टेशनध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Sep 11, 2025 10:51 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Corruption: शिक्षिकेने ओढणी झटकली अन् मुख्याध्यापक जाळ्यात अडकला, छ. संभाजीनगर शिक्षण विभागात खळबळ










