Weather Alert: 24 तासात बदलली हवा, पश्चिम महाराष्ट्रात धो धो कोसळणार, आज 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Last Updated:
आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाजाबाबत जाणून घेऊ. 
1/7
बंगालच्या उपसागरात ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तसेच कर्नाटक पासून तमिळनाडू ते मान्नारच्या आखातापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने महाराष्ट्रात पुन्हा विजांसह पावसाला सुरुवात झाली आहे. आज 11 सप्टेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाजाबाबत जाणून घेऊ.

advertisement
2/7
पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात बुधवारी शून्य मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच कमाल तापमानाचा पारा 31.0 अंश सेल्सिअस इतका वाढला. पुढील 24 तासात पुणे जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहिल. यावेळी कमाल तापमानाचा पारा 31 अंशापर्यंत राहील.

3/7
सातारा जिल्ह्यात 10 सप्टेंबर रोजी पावसाची उघडीप राहिली. पुढील 24 तासात साताऱ्यातील कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस राहील. तसेच सातारा जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून दक्षतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

4/7
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात पावसाची उघडीप राहिली. यावेळी कमाल तापमान 31.2 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. पुढील 24 तासात कमाल तापमान 28 अंशावर स्थिर राहिल. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

5/7
सोलापूर जिल्हात मागील 24 तासात 37 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. बुधारी जिल्ह्यातील 34.9 अंश सेल्सिअस राज्यातील उच्चांकी तापमान ठरले. आज कमाल तापमान 32.6 अंशावर राहिल. तसेच पुढील 24 तासात सोलापूर जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

6/7
सांगली जिल्ह्यात आज विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. आज जिल्ह्यातील कमाल तापमान 29 तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतके राहील.

7/7
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असली तरीही काही ठिकाणी कमाल तापमान वाढत आहे. सोलापुरात राज्यात ऊन-सावल्यांसह ढगाळ वातावरण कायम आहे. सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यास पुढील 24 तासांसाठी विजांसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील काही दिवस पश्चिम महाराष्ट्रतील पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement